"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता

आयपीएलचा सतरावा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 02:25 PM2024-05-12T14:25:49+5:302024-05-12T14:27:08+5:30

whatsapp join usJoin us
former Indian cricketer Irfan Pathan On Rohit Sharma and Hardik Pandya ahead of t20 world cup 2024 | "मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता

"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Irfan Pathan On Rohit Sharma & Hardik Pandya : आयपीएलचा सतरावा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. मुंबई आता अधिकृतपणे आयपीएल २०२४ मधून बाहेर झाली आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषक पाहता भारतीय चाहत्यांसाठी ही चांगली चिन्हे नाहीत. ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर हार्दिक पांड्या उपकर्णधारपदाची भूमिका बजावणार आहे. अशातच टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या खराब फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. 
 
इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून म्हटले की, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माचा फॉर्म मुंबईच्या चाहत्यांशिवाय तमाम भारतीयांसाठी चिंतेचा विषय आहे. पण आम्हाला आशा आहे की दोन्ही दिग्गज लवकरच फॉर्ममध्ये येतील. खरे तर, या मोसमात रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सजविरुद्ध शतक झळकावले होते, पण उर्वरित सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत दिसली. या मोसमात आतापर्यंत रोहित शर्माने ३४९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हार्दिक पांड्याला १३ सामन्यात केवळ २०० धावा करता आल्या आहेत, पण गोलंदाज म्हणून त्याला ११ बळी घेण्यात यश आले. 

जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार
भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंडचे संघ ५ जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आयर्लंड आणि पाकिस्ताननंतर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अमेरिकेचे आव्हान असेल. १२ जून रोजी दोन्ही संघ भिडतील. तर भारत आणि कॅनडा यांच्यात १५ जूनला सामना होणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

Web Title: former Indian cricketer Irfan Pathan On Rohit Sharma and Hardik Pandya ahead of t20 world cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.