शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक आक्रमक; रिफ्लेक्टर सक्तीच्या निषेधार्थ गणवेश काढत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 20:33 IST

विशिष्ट कंपन्यांबरोबर संगनमत करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा, सक्तीमुळे रिक्षा पासिंग होणार खर्चिक

ठळक मुद्दे आम आदमी रिक्षा संघटनेने याविषयावर परिवहन आयुक्तांबरोबर संपर्क साधला असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी

पुणे: मालमोटारींना लागणारे रेडियम रिफ्लेक्टर रिक्षांना सक्तीचे करण्यात आल्याने रिक्षाचालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या सदस्यांंनी आज आरटीओ कार्यालयात गणवेश काढून निषेध व्यक्त केला. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. बनियनवर येऊ नका ही त्यांची विनंती अमान्य करून तसेच निवेदन देण्यात आले.

विशिष्ट कंपन्यांबरोबर संगनमत करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या अंधारात चमकणारे रेडियम रिफ्लेक्टर जड वाहनांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सक्तीचे झाले आहेत. हे रिफ्लेक्टर विशिष्ट मानांकन असलेले असावेत असा नियम नंतर परिवहन विभागाने केला. असे ऊत्पादन करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. 

जड वाहनांसाठी रिफ्लेक्टरची रूंदी ५० एमएम असणे बंधनकारक आहे. रिफ्लेक्टरच्या प्रत्येक १० मीटरनंतर त्यावर एक क्यूआर कोड आहे. रिफ्लेक्टर खरेदी केल्यानंतर हा क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र विक्रेत्याने जड वाहनाच्या मालकाला द्यायचे आहे. रिफ्लेक्टर लावलेले नसतील व हे प्रमाणपत्र नसेल तर जड वाहनांना वाहतूकीचा परवाना मिळत नाही असे संघटनेचे पदाधिकारी अंकूश आनंद यांनी सांगितले.

...कारण त्याशिवाय रिक्षा पासिंग होणार नाही

एरवी फक्त १०० रूपयात त्यांचे काम व्हायचे. आता त्यासाठी त्यांंना १ हजार रूपये मोजावे लागतील. जड वाहनांना १० मीटरच्या पट्टीची गरज असते. रिक्षासाठी २ मीटर टेपही जास्त होईल, पण क्यू आर कोडसाठी त्यांना १० मीटरचीच खरेदी गरज नसताना करावी लागेल. ५० एमएम रूंदीचा टेपही रिक्षाचा आकार लक्षात घेता जास्तच होणार आहे. तरीही तो खरेदी करावाच लागणार आहे, कारण त्याशिवाय रिक्षा पासिंग होणार नाही.

कोरोनामुळे सहा महिने रिक्षा बंद होत्या. आता सुरू असल्या तरी व्यवसाय कमी झाला आहे. त्यात असली खर्चिक सक्ती झाल्याने रिक्षाचालक वैतागले आहेत. आम आदमी रिक्षा संघटनेने याविषयावर परिवहन आयुक्तांबरोबर संपर्क साधला असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार