शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

By नितीश गोवंडे | Updated: August 18, 2022 12:18 IST

अन्याय करणारे खाकीतील हे लोक नको; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचा विश्वास हा रेल्वेतीलपोलिसांवर असतो. पण हेच पोलीस जर प्रवाशांची लूटमार करत असतील तर प्रवाशांनी दाद मागायची कुणाकडे, असा सवाल उपस्थित होतो. पुण्याहून हावड्याला जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

आझाद हिंद एक्स्प्रेस दररोज पुण्याहून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निघते. मंगळवारी (१६ ऑगस्ट) मात्र ही रेल्वे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्म नं. १वर यार्डातून आली. यावेळी जनरल तिकीट घेऊन प्रवासासाठी निघालेले प्रवासी डब्यात जाताच आधीपासूनच आत बसलेल्या आणि स्वत:ला रेल्वे पोलीस आहोत, असे सांगणाऱ्या ५ ते ६ जणांनी प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर ३०० रुपये द्या अन्यथा बाहेर फेकून देऊ, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी त्यांना पैसे दिले. पैसे घेऊन हे आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर उतरून निघून गेले. यानंतर काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले असता, पी. डी. चौधरी नामक कर्मचाऱ्याने तुमच्या तक्रारीवरून काही होणार नाही, असे उलटे धमकावले.

महिलांशी अश्लील भाषा...

काही महिलांनी डब्यात आधीपासून असलेल्या साध्या वेशातील आरपीएफला पैसे देण्यास विरोध केला असता त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत रेल्वेतून फेकून देण्याची धमकी देण्यात आली. यामुळे घाबरून या महिलांनीही त्यांना पैसे दिले. दरम्यान, हे लोक दारू प्यायलेले असल्याचेदेखील प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हे रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे संगनमत...

घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून, दररोज असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये रेल्वे अधिकारी आणि आरपीएफ यांचे संगनमत असून, मुद्दाम काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत, जेणेकरून यांचा गोरख धंदा असाच सुरू राहील, याची काळजी घेतल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

दहशतवादी थेट मारून टाकतात; पण हे खाकी वर्दीतील गुंड न परवडणारे आहे. पी. डी. चौधरी नामक आरपीएफ जवानाने मला तुमच्या तक्रारीने काही होणार नाही, सगळ्यांनी तक्रार दिली तरच आम्ही कारवाई करू शकतो, असे सांगितले. एक किंवा दहा तक्रारी काय फरक पडतो. त्यामुळे आरपीएफ जवानांनी कारवाई करणे गरजेचे होते, अशी आपबिती एका प्रवाशाने ‘लोकमत’कडे सांगितली.

हा प्रकार मला माहीत नव्हता. बरे झाले तुम्ही माझ्या कानावर घातले, आम्ही सीसीटीव्ही बघून योग्य ती कारवाई करू. - उदयसिंग पवार, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त

‘लोकमत’चे पुणे रेल्वे विभागाला प्रश्न..

१) रेल्वे जर यार्डातून प्लॅटफॉर्मवर आली तर आधीपासून जनरल डब्यात लोक कसे?२) एक प्रवासी का होईना तक्रार करायला पुढे आला होता तर आरपीएफने गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही?३) सीसीटीव्ही संपूर्ण प्लॅटफॉर्म कव्हर होईल, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक हालचाली दिसतील असे का लावलेले नाहीत?४) आरपीएफ आणि जीआरपीकडे रेल्वेसह प्रवाशांची जबाबदारी असताना आरपीएफच प्रवाशांची लूटमार करत असतील तर प्रवाशांनी तक्रार कुणाकडे करायची?५) आरपीएफ आणि रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार?६) परप्रांतीय लोकांकडून अशा धमक्या देऊन पैसे उकळणे योग्य आहे का?७) एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना खाकी वर्दीचेच लोक प्रवाशांची लूटमार करत असतील तर अजून किती वर्षे हा अत्याचार सुरू राहील?

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा