शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका

By नितीश गोवंडे | Updated: July 21, 2023 20:07 IST

किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले

पुणे : रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याचीही जबाबदारी ते पार पाडतात. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ४०८ मुलांची सुटका केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानक, तसेच प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत या कामाला प्राधान्य दिले. या ४०८ मुलांमध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांचा पालकांशी संपर्क करून देण्यात आला.

घरातील किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे तसेच काहीजण चांगले जीवन आणि शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले. रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि मुलांना पालकांशी पुन्हा, बोलण्याचा, भेटण्याचा सल्ला देतात.

एप्रिल ते जून दरम्यानची विभागनिहाय आकडेवारी..

- पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व मुलांचाच समावेश आहे.- मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे.- भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली.- नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली असून त्यात २१ मुले आणि १९ मुलींचा समावेश आहे.- सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून यामध्ये ७ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेPoliceपोलिसFamilyपरिवारSocialसामाजिक