Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून रॉडने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:16 IST2022-04-05T17:13:45+5:302022-04-05T17:16:28+5:30

हा प्रकार शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला...

rod hit him by throwing pepper powder in his eye pune crime news | Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून रॉडने केली मारहाण

Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून रॉडने केली मारहाण

पुणे : गाडीवर कचरा पडल्याच्या कारणातून झालेल्या वादात तिघांनी एका दाम्पत्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी शुभम राजेश अग्रवाल (वय १९), गौरव राजेश अग्रवाल (वय १९) व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुंदर रामकरण अग्रवाल (वय ४५, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारी राहतात. सुंदर हे घराजवळील झाडाची पाने कट करत होती. त्यावेळी पानांचा पालापाचोळा आरोपीच्या गाडीवर पडला होता. काम झाल्यानंतर तो झाडून देतो असे फिर्यादींनी सांगितले होते. मात्र फिर्यादींचा पुतण्या शुभम याने इतरांना बोलावून घेऊन लोखंडी रॉडने फिर्यादींच्या डोळ्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच आरोपी महिलेने मिरचीपूड फिर्यादींच्या डोळ्यात टाकून त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील निरगुडकर तपास करीत आहेत.

Web Title: rod hit him by throwing pepper powder in his eye pune crime news