रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 17:22 IST2021-03-11T17:20:07+5:302021-03-11T17:22:13+5:30
दोन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन लाख 47 हजार पाचशे रुपयांची चोरी...

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत खेड-शिवापूर येथे पेट्रोल पंपावर दरोडा
खेड-शिवापूर: खेड-शिवापूर येथील कुदळे अँड सन्स एचपी पेट्रोल पंपावरती दोन अज्ञात इसमाकडून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दोन लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापुर येथील कुदळे अँड सन्स पेट्रोल पंपमधील ऑफिसरूममध्ये अमोल भीमराव पंडित व सुदर्शन देवीदास वानखेडे हे दोन कामगार दिवसभरातील पेट्रोल-डिझेल विक्री केलेल्या पैशाचा हिशोब करत असताना दोन अनोळखी इसम ऑफिसमध्ये घुसले. त्यांनी दोन रिव्हॉल्वरचा धाक दाखवत दोन लाख 47 हजार पाचशे रुपयांचा माल चोरी करून घेऊन मोटारसायकलवरून त्यांनी पोबारा केला. त्या दोन अनोळखी इसमाचा विरुद्ध फिर्याद केली गेली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल मगदूम हे करत आहेत.