Pune Crime: शस्त्राच्या धाकावर सासवड रस्त्यात लूट, तिघांवर ‘मोक्का’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:04 IST2023-10-18T09:04:05+5:302023-10-18T09:04:53+5:30

आतापर्यंत शहरातील ६९ गुंड टोळ्यांविरुद्ध ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे...

Robbery in Saswad road at gunpoint, mcoca on three | Pune Crime: शस्त्राच्या धाकावर सासवड रस्त्यात लूट, तिघांवर ‘मोक्का’

Pune Crime: शस्त्राच्या धाकावर सासवड रस्त्यात लूट, तिघांवर ‘मोक्का’

पुणे : हडपसर सासवड रस्त्यावर वाहनचालकांना धमकावून लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहरातील ६९ गुंड टोळ्यांविरुद्ध ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

निलेश मल्हारी बनसुडे (वय २६), ओम सोमदत्त तारगावकर (वय २१), रोहित मच्छिंद्र जामदार (वय २३, तिघे रा. इंदापूर) अशी मोक्का कारवाई केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका दुचाकीस्वाराने लाेणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार दुचाकीस्वार आणि त्याचा मित्र सासवड रस्त्याने निघाले होते. त्यावेळी आरोपी मोटारीतून निघाले होते.

आरोपींनी दुचाकीस्वाराशी वाद घालून त्याला शस्त्राचा धाक दाखविला. दुचाकीस्वाराकडील रोकड लुटून आरोपी पसार झाले होते. बनसुडे आणि साथीदारांनी गंभीर गुन्हे केले असल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पडताळणी करून पोलिस आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी बनसुडे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: Robbery in Saswad road at gunpoint, mcoca on three