लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 22:46 IST2021-07-05T22:41:16+5:302021-07-05T22:46:56+5:30

लोणीकंद ते बकोरी रस्त्यावरील खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Robbery gang arrested in Lonikand area | लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत

लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत

पुणे : लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले. 
दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २३), गौरव अर्जुन परजणे (वय २०), किशोर विश्वनाथ जाधव (वय २२), दत्ता बबन व्यवहारे (वय ३७, सर्व रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, मिरची पूड, २ दुचाकी असा १ लाख १५ हजार ७३६ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्त घालत असताना लोणीकंद ते बकोरी रस्त्यावरील खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपींना ताब्यात घेतले. 

अंधारात रस्त्याने येणारी जाणारी वाहने तसेच पादचार्‍यांना लुटमार करुन दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते. दत्ता गायकवाड व किशोर जाधव या दोघांवर चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Robbery gang arrested in Lonikand area