शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट

By किरण शिंदे | Updated: May 28, 2025 16:11 IST

सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले

पुणे : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात एका धक्कादायक आणि धाडसी दरोड्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या भावना डळमळीत केल्या आहेत. शहरातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर २७ मे रोजी मध्यरात्री २० ते २२ दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून साडेअकरा लाखांची लूट केली आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार झाले. विशेष म्हणजे हा बंगला लोणावळा शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर आहे.

सुरक्षा कवच भेदून घरात प्रवेश

दरम्यान, ही संपूर्ण घटना रात्री तीनच्या सुमारास घडली. टोळक्याने एका टेम्पोमधून येत बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला. सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले. घरात शिरल्यानंतर सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत दोरखंडाने बांधून ठेवले. त्यानंतर टोळीने खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवत घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.

टेम्पोतून आले, पुरावे मागे टाकून पळाले

या टोळक्याने गुन्हा करून पळताना आपला टेम्पो बंगल्यातच सोडून दिला. या टेम्पोत चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून दरोडेखोरांचे नियोजन आणि गुन्ह्याची तयारी स्पष्ट होते. मात्र, ही टोळी पोलिसांना सांडून पसार झाली.

पोलिसांचा पाठलाग अयशस्वी, लोक संतप्त

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बंगल्याकडे धाव घेतली आणि काही अंतर दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, हा ‘फिल्मी स्टाईल’ पाठलाग यशस्वी ठरला नाही. चोरटे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल घेऊन सहजतेने पसार झाले. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरून पुढील तपास सुरू आहे.

घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक प्रतिनिधी श्रीधर पुजारी यांनी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी करत म्हटले, “जर लवकरात लवकर आरोपी पकडले नाहीत, तर लोणावळा बंदची हाक दिली जाईल.”

पोलिसांची चौकशी सुरू – चार पथके मागावर

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, “घटनेनंतर तात्काळ चार विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरु आहे.”

पोलिसांची भीती राहिली का?

हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या नाकाखाली घडला असून, दरोडेखोरांचा आत्मविश्वास इतका होता की त्यांनी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरही गुन्हा करताना कसलाही अजिबात संकोच केला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे – “पोलीसांची भीती राहिली आहे का?”

खंडेलवाल यांच्यावर चौथा दरोडा

विशेष म्हणजे, डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेला हा चौथा दरोडा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक गुन्हेगारी नेटवर्क आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून तपास पुढे नेण्यात येत आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घटनेने लोणावळ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत."

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसाcctvसीसीटीव्ही