शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

रस्ते दुरुस्तीपायी पाच वर्षात १०० कोटी खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 07:00 IST

खड्डे पडण्याचे प्रमाण यंदा वाढले असून नविन रस्त्यांवर ही समस्या अधिक जाणवत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देक्षेत्रिय कार्यालयस्तरावरील खर्च अधिक 

पुणे : पाऊस, खोदाई, खड्डे यासह अन्य कारणांमुळे बिघडलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी गेल्या पाच वर्षात तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. गेल्या पाच वर्षात खड्डे दुरुस्तीवर जवळपास ४० कोटींचा तर विविध कारणांनी खोदले गेलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी ५५ कोटींचा खर्च गेल्या तीन वर्षात झाला आहे. खड्डे पडण्याचे प्रमाण यंदा वाढले असून नविन रस्त्यांवर ही समस्या अधिक जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामाचा दर्जा तपासण्याची पालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. जलवाहिन्या टाकणे, टेलिफोन, विद्यूत केबल्स, ऑप्टिकल फायबर केबल, पदपथामधून लाईन्स व डक्ट करणे, गॅस वाहिन्या टाकणे, ड्रेनेज लाईन बदलणे, रस्ता ओलांडण्यासाठी चौकांलगत डक्ट व चॅनल तयार करणे आदी कारणास्तव सतत रस्ते खोदाई करावी लागते. पालिकेच्या मुख्य सभेने  अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईड लाईन्स (युएसडीजी) हे धोरण मंजूर केलेले आहे. त्यामध्ये रस्त्याची बांधणी करताना रस्त्यावरील सर्व युटिलिटी लाईन्स टाकण्यासाठी स्वतंत्र डक्ट्स (कॅरेजवे सोडून) ठेवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे नमूद केली. परंतू, त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासन कमी पडत आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये रस्त्यांच्या अडचणींसंदर्भात जवळपास सहा हजार नागरिकांनी आॅनलाईन तक्रारी केल्या आहेत. यामध्ये खड्ड्यांसह रस्त्यावरील राडारोडा, चेंबर दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती अशा कामांसाठीच्या तक्रारींचाही समावेश आहे. क्षेत्रिय कार्यालयस्तरावर बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम खात्यामार्फत करण्यात येते. रस्ते बनविताना डांबर, सिमेंट, खडी, वाळू आणि विटा यांचा दर्जा अभियंते, अधिकारी आणि थर्ड पार्टी संस्थेकडूनही तपासण्यात येतो. तरीही रस्त्यावर खड्डे पडतात. ठेकेदारामार्फत करण्यात येणाऱ्या कामांची तपासणी ईआयएल या त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाते. रस्ते तयार केल्यानंतर  डिफेक्ट लायबिलीटी पिरीयड मध्ये खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करुन घेण्याची अट आहे. परंतू, या कालावधीत खड्डेच पडले नसल्याचा पालिकेचा दावा आहे. ====परिमंडलनिहाय खड्ड्यांवरील खर्चाची आकडेवारी

वर्ष                परिमंडल एक        दोन         तीन            चार             पाच        २०१५-१६      ५०.३५                १८.४३        ३२.८६          १३.६६        २८.९४        २०१६-१७      ३६.७३                 ४१.८९        ३२.४६         १९.२४        ५१.१२२०१७-१८      २१.१४                २९.९२        २४.४८          २६.१२        ४६.२६२०१८-१९       ५७.३२               ३६.५६        २२.२७          ४२.९०        ५५.९१२०१९-२०      ०.००                  ०.००           ०.००          ०.००             ०.००एकूण          १६५.५४               १२६.८        ११२.०७        १०१.९२      १८२.२३=====पथ विभागाकडून खड्ड्यांवर झालेला खर्चवर्ष                रक्कम२०१६-१७            ८३ लाख ९३ हजार ३९०२०१७-१८            ९३ लाख ३४ हजार ४२६२०१८-१९            १ कोटी १२ लाख ४८ हजार२०१९-२०            ५२ लाख २० हजार ०५०

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसा