शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेळ नदी दुथडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 06:01 IST

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पुन्हा एकदा दुपारी ४ नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ३ ते ४ तास चाललेल्या पावसाने या भागातील

पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पुन्हा एकदा दुपारी ४ नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ३ ते ४ तास चाललेल्या पावसाने या भागातील सर्व परिसर हा जलमय झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पावसाचे पाणी वाहत असून, शेतजमिनीचे बांध काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. सर्व शेतजमीन ही पाण्याखाली गेलेली आहे. सर्व रस्ते जलमय झाल्याने; तसेच वीजप्रवाह देखील बराच काळ खंडित झाल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी गावडेवाडी, कुदळेवाडी, श्रीरामनगर आदी गावांत; तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांना जोरदार पावसाने झोडपले असून, सर्व परिसर हा जलमय झाला आहे. सर्व रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत आहेत. या भागातील पेठ परिसरातून वाहणारी वेळ नदी ही पेठ परिसरात दुथडी भरून वाहत होती. पेठ गावातून पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या वेळ नदीच्या पुलावरून सुमारे तासभर पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातूनच जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील सर्व वाहतूकही बाहेरून जाणाऱ्या रस्त्याने वळविण्यात आली होती.पावसाचा जोर सलग तीन तास होता. शेतातून पाण्याचे पाट पाहत आहेत. शेणखत पावसाच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामासाठी तयारी सुरू करता येईल. (वार्ताहर)