शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मुंबई, पुण्यातून येणाऱ्या पाहुण्यांमुळे मावळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 19:12 IST

पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड येथून मावळात मावळात चार दिवसांत अनेकजण दाखल..

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन : प्रशासनाचा डोळा चुकवून आडमार्गाने घुसखोरीपुणे व मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या महामार्गावर मावळ तालुका

कामशेत : कोरोना संसर्गजन्य महामारी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त आहे. मात्र, त्यांचा डोळा चुकवून मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड येथून मावळात येणाऱ्या पाहुण्यांमुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. परिणामी मावळात दाखल होणाऱ्या नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

पुणेमुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या महामार्गावर मावळ तालुका आहे. कडक उपाययोजनामुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आहे. मात्र पुणे, मुंबई, पिंपरी - चिंचवड आदी शहरांतून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करून मावळात चार दिवसांत अनेकजण दाखल झाले आहेत. त्यामुळे या नागरिकांमुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाच्या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. 

खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत वडगाव पंचायत समितीमध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीवेळी खासदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. तरी देखील उपनगरातील नागरिक मावळात येत आहेत. दिवसा कडक बंदोबस्त असल्याने अनेक जण रात्रीच्या अंधाराचा अथवा पहाटेचा फायदा घेऊन मावळात येत असल्याने प्रशासनाला मागमूस लागत नाही. ज्यांच्याकडे हे पाहुणे म्हणून येत आहेत. ते याची माहिती प्रशासनाला देत नाहीत. आजूबाजूच्या नागरिकांना कळते पण आपापसात वाद नको किंवा आपणच का पुढाकार घ्यायचा इतर स्थानिक करतील तक्रार अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे मावळात सर्वत्रच गेल्या काही दिवसांमध्ये पुणे व मुंबई येथील पाहुणे यात बहुतांश नातेवाईक परत आल्याचे दिसत आहे. ग्रामीण भाग देखील यातून सुटला नसून डोंगर तसेच आडमार्गे मुंबई येथील नागरिकांनी अनेक गावांमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक फार्महाउस व बंगले मालक निवासी आले आहेत, अशी माहिती नागरिक देत आहेत. प्रशासनाने संबंधिताचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. 

दोन लाखाची तपासणी, एकही नाही बाधित...मावळात तिसऱ्या टप्यातील २ लाख ११ हजार ९७५ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून अद्याप एकही कोरोनाबधित रुग्ण आढळला नाही. यातील ४ हजार ३७१ नागरिकांपैकी ४ हजार २ जणांची १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने सोडून देण्यात आले आहे. सध्या ३६९ जणांना अजूनही देखरेखीखाली ठेवले असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

ते ९९ पाहुणे विलगीकरण कक्षात...पुणे, मुंबई, पिंपरी आदी ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे भीती पोटी अनेक जण चोरून लपून मावळात येत आहे. मंगळवार (दि. २१) ते शुक्रवार (दि. २४) या चार दिवसांत पुणे, मुंबई, पिंपरी - चिंचवड व इतर शहरे आदी भागांतील ९९ नागरिक मावळ तालुक्यात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे तालुका सनियंत्रक राहुल चोकलिंगम दिली.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेMumbaiमुंबईPoliceपोलिस