शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तरूणींमध्येही वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:17 PM

भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे .

ठळक मुद्देलैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना नियमितपणे करून घ्यावी पॅप स्मिअर चाचणी कर्करोगपूर्व टप्प्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण

पुणे : तरूण वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या विशीतील मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढू लागली आहे. गर्भधारणेचे प्रमाण जास्त असणे, कमी वयात लैंगिक संबंध राखणे, हॉर्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर, कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तर, अस्वच्छता आणि अँटि ऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी असलेला आहार या घटकांमुळे आजाराची शक्यता बळावत आहे. पुर्वी हा आजार ३० वर्षांवरील महिलांमध्ये आढळून येत होता.  भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे . गर्भाशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढल्याने हा कर्करोग होतो. हा कर्करोग महिलांच्या गर्भाशयाच्या प्रवेशद्वाराला होतो. स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनेने गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक असले तरी हा कर्करोग मोठ्या प्रमाणावर मृत्यूस कारणीभूत ठरणारा (सोशल कीलर) मानला जात नाही. हा आजार केवळ लैंगिक संबंधांमधूनच होतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. प्रतिबंधात्मक तंत्रांच्या माहितीचा आणि नियमित आरोग्य तपासणीने होणारे निदान याविषयीच्या माहितीचा अभाव यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.याविषयी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी बुरांडे लाहा म्हणाल्या, पूर्वी ३० वर्षांवरील महिलांमध्ये हा आजार आढळून येत असे. पण अलीकडील काळात विशीतील तरुणींमध्येही आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तरुण वयात लैंगिकदृष्ट्या सक्रिय झालेल्या मुलींना हा आजार होण्याची शक्यता वाढते. संभोग करताना ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. परंतु, लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार होतो, असे नाही.-------------लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांना नियमितपणे पॅप स्मिअर चाचणी करून घ्यावी. या कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. कर्करोगपूर्व टप्प्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण असते. या आजाराविषयची जनजागृतीसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्राथमिक माहिती देणे आवश्यक आहे.- डॉ. अस्मिता पोतदार, स्त्रीरोगतज्ज्ञ------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यWomenमहिलाBreast Cancerस्तनाचा कर्करोगdoctorडॉक्टर