शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाचे अधिकार पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांना

By admin | Updated: August 28, 2015 04:38 IST

शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिकेला देण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळ व महापालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मदतीला

पुणे : शिक्षण मंडळाचे अधिकार महापालिकेला देण्यात आल्यानंतर शिक्षण मंडळ व महापालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये फरक असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मदतीला महापालिकेतील एक अधिकारी देऊन अधिकार विभागणी केली होती. मात्र, आता आयुक्तांच्या माध्यमातून सर्व अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली.शिक्षण मंडळाचा कारभार दोन-दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याने जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सभासदांकडून मुख्य सभेत करण्यात आला. त्याचबरोबर, शिक्षण मंडळाचे अधिकारी शाळांमध्ये फिरकत नाहीत. शाळांचा दर्जा घसरत असल्याच्या तक्रारी सभासदांनी केल्या. तसेच, शालेय साहित्य अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याची तक्रार वैशाली बनकर यांनी केली. दीपक मानकर, अस्मिता शिंदे, अरविंद शिंदे यांनी शिक्षण मंडळाच्या तक्रारी मांडल्या. त्याबाबत उत्तर देताना राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘शिक्षण मंडळाला पूर्ववत सर्व अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शिक्षणाधिकाऱ्यांकडेच सर्व अधिकार आयुक्तांच्या माध्यमातून दिले जातील. इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’’शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांनी सांगितले, ‘‘एमकेसीएलचे ७६ लाख रुपयांचे बिल पेंडिंग आहे. ते बिल मिळाल्यानंतरच प्रशिक्षण देऊ, असे त्यांनी सांगितले आहे. लवकरच त्यांना बिल दिले जाईल.’’शिक्षण मंडळाच्या शाळांना सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांना एक गणवेश दिला आहे. कोंढवा व वानवडी वगळता इतर शाळांना दप्तरे उपलब्ध करून दिली आहेत. ठेकेदाराला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ११ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती. ती संपल्याने त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर, दिलेल्या साहित्याची तपासणी केली जाईल. निकृष्ट साहित्य आढळल्यास कारवाई बडगा उगारला जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले. ...त्या शिक्षकाची बदली करणारमुलींची छेडछाड काढल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एका शिक्षकाची पुन्हा हडपसरमधील मुलींच्या शाळेत बदली करण्यात आल्याची तक्रार नगरसेवक फारूक इनामदार यांनी केली. ही नेमणूक चुकीची आहे. लगेच त्याची बदली रद्द करू. मुलींच्या शाळेत हा शिक्षक काम करणार नाही याची दक्षता घेऊ, असे स्पष्टीकरण राजेंद्र जगताप यांनी दिले.