शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात १ ऑक्टोबरला रिक्षा 'बंद' चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:35 PM

याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत...

ठळक मुद्देसुमारे ८५० रिक्षा तळांपैकी शहरातील सुमारे १५० रिक्षा तळांवर रिक्षा चालकांशी संवाद

पुणे : लॉकडाऊनमुळे मोडकळीस आलेला रिक्षा व्यवसाय व चालकांच्या आर्थिक परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये १ ऑक्टोबरला रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा पंचायतने घेतला आहे. यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.    रिक्षा बंदचा निर्णय घेण्याआधी मागील आठवडाभर रिक्षा पंचायतीने चालकांची मते जाणून घेतली. सुमारे ८५० रिक्षा तळांपैकी शहरातील सुमारे १५० रिक्षा तळांवर रिक्षा चालकांशी संवाद साधण्यात आला. याठिकाणच्या ९७ टक्के रिक्षाचालकांनी बंदच्या बाजूने आपले मत नोंदवले. गेले आठवडाभर चाललेल्या या मतचाचणी नंतर शनिवारी (दि.. २६) रिक्षा चालकांच्या सभेत बंद वर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरचिटणीस नितीन पवार, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगाडे, पथारी पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे, लोकायतच्या अ‍ॅड. मोनली अपर्णा, जितेंद्र फापाळे यांच्यासह अनेक रिक्षाचालक उपस्थित होते. दि. १ ऑक्टोबर रोजी शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात येणार असून सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयामोर निदर्शने केली जाणार आहे.आढाव म्हणाले, रिक्षा चालकांसह कष्टकऱ्यांनी जगायचे कसे याचे उत्तर मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रिक्षा चालकांना मदतीसाठी अनेक मार्गांनी पैसा उभा करता येईल. धार्मिक संस्थांमधील पैसा या संकटावेळी कामाला आणावा. घरी उपाशी मारण्यापेक्षा रस्त्यावरच्या आंदोलनात होणाऱ्या कोणत्याही कारवाईला सामोरे जावू. त्याकरता वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्याची आमची तयारी आहे, असा इशाराही आढाव यांनी दिला. ‘लॉकडाऊनकाळात रिक्षा सेवा व रिक्षा चालक यांना सावरण्यासाठी शासनाने  कोणतेही धोरण राबविले नाही. रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुराव केला पण हाती काहीच लागले नाही. या परिस्थितीत शासनाला जाग आणणण्यासाठी एक दिवसाचा रिक्षा बंद होत आहे. हा बंद पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये होत आहे. यामधून राज्यातील रिक्षा चालकांचे प्रश्न मांडले जातील,’ असे पवार यांनी सांगितले.---------------रिक्षा पंचायतच्या काही मागण्या -१. रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करावे२. रिक्षा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत मोडत असल्याने एस.टी, पीएमपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा किमान वेतन १४ हजार मिळावे३. लॉकडाऊन काळातील वाहन कर्जाचे हप्ते शासनाने भरावे, त्यासाठी शेतकरी कर्जमुक्तीच्या धर्तीवर पॅकेज द्यावे.४. थकलेल्या हप्त्यांसाठी फायनान्स कंपन्या करत असलेला छळ थांबवावा.५.चार महिन्यांचा विमा हप्त्याचा परतावा सुमारे ३ ते ४ हजार रिक्षा चालकाला परत मिळावा.६. रिक्षांचा मुक्त परवाना रद्द करावे-------------

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाStrikeसंपState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय