शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परमिट माफियांकडून रिक्षाचालकांची पिळवणूक

By admin | Updated: September 23, 2014 06:51 IST

रिक्षाचालकांना रिक्षाचा मालक बनण्याचे गाजर दाखवून परमिटसह रिक्षा हप्त्यावर विकत देऊन परमिट माफियांकडून लुबाडले जात आहे

दीपक जाधव, पुणेरिक्षाचालकांना रिक्षाचा मालक बनण्याचे गाजर दाखवून परमिटसह रिक्षा हप्त्यावर विकत देऊन परमिट माफियांकडून लुबाडले जात आहे. रिक्षाचे कर्ज फेडता न आल्याने रस्त्यावर येण्याची वेळ रिक्षाचालकांवर येत आहे.राज्य शासनाकडून रिक्षा चालविण्याचे परमिट दिले जाते. मात्र, १९९७ पासून शासनाने रिक्षा परमिटचे वाटप करणे बंद केले आहे. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ४५ हजार परमिटधारक आहेत. रिक्षाचालकाकडे परमिट असल्याशिवाय त्याला नवीन रिक्षा विकत मिळत नाही. त्यासाठी परमिटधारकाकडून ते विशिष्ट मुदतीसाठी भाड्याने घेऊन त्याला रिक्षा विकत घ्यावी लागते.शहरामध्ये १०० ते १५० परमिट माफिया कार्यरत आहेत. साधारणत: १५ हजार परमिट अशा माफियांच्या ताब्यात आहेत. परमिटधारक वारल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीकडून लिहून घेतलेले, अडचणीमुळे विकले गेलेले तसेच सरकारी नोकरी करणाऱ्याने गुपचूप वापरायला दिलेले असे ते परमिट आहेत. ५ वर्षांसाठी ८० हजार ते १ लाख रुपये भाड्याने ते रिक्षाचालकांना दिले जाते. परमिटसह रिक्षा विकत देतो, असे सांगून रिक्षाचालकांना फसविणारी परमिट माफियांची टोळी शहरामध्ये कार्यरत आहे. त्यासाठी रिक्षाचालकांना काही रक्कम भरायला लावायची. ५ वर्षांसाठी त्याला परमिट भाड्याने द्यायचे व भरमसाठ व्याज असलेले कर्ज एखाद्या पतसंस्थेकडून काढून द्यायचे. त्या कर्जाचे एक-दोन जरी हप्ते तटले तर लगेच रिक्षा ओढून न्यायची. परमिटच्या भाड्याची ५ वर्षे संपल्यानंतर पुन्हा त्या रिक्षाचालकाला परमिटसाठी एजंटाकडे जावेच लागते. या चक्रात रिक्षाचालक भरडला जात आहे.