महिलेची बॅग हिसकाविणारा रिक्षाचालक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST2021-07-28T04:12:24+5:302021-07-28T04:12:24+5:30

राहुल प्रकाश भोडणे (वय २९, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. कोंढवा येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या ...

The rickshaw puller snatched the woman's bag | महिलेची बॅग हिसकाविणारा रिक्षाचालक गजाआड

महिलेची बॅग हिसकाविणारा रिक्षाचालक गजाआड

राहुल प्रकाश भोडणे (वय २९, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. कोंढवा येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जूनला सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली. या अंतराचे ५० रुपये भाडे होत असतानाही राहुल भोडणे याने २०० रुपये भाडे मागितले. त्यावरून वाद झाल्याने भोडणे याने या महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली होती. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यातील रिक्षाचालकाचा शोध घेतला जात होता. पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना रिक्षाचालक पहिले भाड्याचे घर सोडून टिळेकरनगर येथे रहायला गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भोडणे याला ताब्यात घेतले. गुन्हा केल्यानंतर रिक्षा टिळेकरनगर येथे लपवून ठेवली होती. पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी रिक्षा जप्त करून आरोपीसह पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: The rickshaw puller snatched the woman's bag