सिंहगड रस्त्यावरील पेट्रोलपंपावर रिक्षाने घेतला अचानक पेट; प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:31 PM2021-02-13T19:31:12+5:302021-02-13T19:32:50+5:30

वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला; एकजण किरकोळ जखमी 

A rickshaw at a petrol pump on Sinhagad Road suddenly took fire | सिंहगड रस्त्यावरील पेट्रोलपंपावर रिक्षाने घेतला अचानक पेट; प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला  

सिंहगड रस्त्यावरील पेट्रोलपंपावर रिक्षाने घेतला अचानक पेट; प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला  

Next

धायरी: सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात असणाऱ्या मिताली सर्व्हिस स्टेशन या भारत पेट्रोल पंपावर एका रिक्षा मध्ये सि एन जी गॅस भरत असताना अचानक पंपाचा नोजल खराब झाल्याने नोजलमध्ये स्पार्क झाल्याने एका रिक्षाने पेट घेतला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. 

सीएनजी पंपावर एका रिक्षामध्ये पंपावरील कर्मचारी रिक्षामध्ये गॅस भरत असताना नोजल खराब झाल्याने गॅस भरणे बंद होत नव्हते. दरम्यान अचानक रिक्षाने पेट घेतला. प्रसंगावधान राखून रिक्षा चालकाने पेटती रिक्षा पंपाच्या बाहेर काढली. पंपाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सीओटीच्या माध्यमातून पेटती रिक्षा विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या रिक्षाशेजारी उभी असणारी दुसऱ्या रिक्षाचेही आगीत नुकसान झाले आहे. रिक्षाचालकाला थोडे भाजले असून  त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सनसिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग पूर्णपणे विझली असल्याची खात्री केली. या पेट्रोल पंप परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: A rickshaw at a petrol pump on Sinhagad Road suddenly took fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.