Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 14:08 IST2022-01-16T14:07:20+5:302022-01-16T14:08:41+5:30
बाईक टॅक्सी बंद झाली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करू असा इशारा

Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद
पुणे : पुणे व पिपरी चिंचवड परिसरात जवळपास 30 हजार बेकायदेशीर बाईक टॅक्सी धावत आहे. याचा फटका जवळपास 1 लाख 30 हजार रिक्षा चालकांना बसत आहे. आरटीओ प्रशासन व सायबर पोलीस आपल्या जवाबदारी झटकत आहेत. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारानी या संदर्भात कारवाईचे आश्वासन दिले होते. त्याचे स्मरण करून देण्यासाठी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने अजित पवार यांना दादा मला वाचवा अशी आर्त हाक मारली आहे. या निमित्ताने पुण्यातील जवळपास 5 हजार रिक्षावर दादा मला वाचवाचे पोस्टर लावले आहे.
पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक #Pune#autorickshawpic.twitter.com/ukXRc9Wi9Q
— Lokmat (@lokmat) January 16, 2022
बाईक टॅक्सी मुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रोजचे सातशे - आठशेचे उत्पन्न आता शंभर दीडशे इतके झाले आहे. बाईक टॅक्सी हे बेकायदेशीर असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केले.या बाबत सायबर शाखेच्या पोलिसांवर बैठक घेऊन सायबर पोलीसानी ते अँप बंद करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी हे काम आमचे नसल्याचे सांगून कारवाईस नकार दिला. त्यामुळे ही बेकायदेशीर वाहतूक सुरूच आहे.यापूर्वी अजित पवार यांनी आठवड्यात संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कारवाई झाली नाही. तेव्हा आमच्या आर्त हाकेतून तरी यंत्रणेला जाग येईल अशी आशा बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर यांनी संगीतले. बाईक टॅक्सी बंद झाली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करू असा इशारा देखील क्षीरसागर यांनी दिला.