Pune: पुण्यात कौटुंबिक वादातून रिक्षाचालकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 18:09 IST2021-11-22T18:04:08+5:302021-11-22T18:09:27+5:30

धनकवडी : कौटुंबिक वादातून एका रिक्षाचालकाने रहात्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. तुषार कलशेट्टी, (वय ३१ वर्षे) राहणार सर्वे ...

rickshaw driver commits suicide family dispute dhankawadi | Pune: पुण्यात कौटुंबिक वादातून रिक्षाचालकाची आत्महत्या

Pune: पुण्यात कौटुंबिक वादातून रिक्षाचालकाची आत्महत्या

धनकवडी: कौटुंबिक वादातून एका रिक्षाचालकाने रहात्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. तुषार कलशेट्टी, (वय ३१ वर्षे) राहणार सर्वे नंबर १६ साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पत्नीसोबतच्या वादामुळे रिक्षाचालकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार कलशेट्टी हे मागील दहा वर्षांपासून रिक्षा चालवत होते. साईसिद्धी चौकाजवळ ते, पत्नी व नऊ महिन्याचा मुलगा असे तिघेजण रहात होते. प्राथमिक माहितीनुसार पती-पत्नी मध्ये वादविवाद होते. घटनेच्या दिवशी तुषार घरी एकटेच असताना घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. सोमवारी सकाळी झाडूवाली महिलेस खिडकीतून तुषारचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांना खबर देण्यात आली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Web Title: rickshaw driver commits suicide family dispute dhankawadi