शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोडी लिपीच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न

By admin | Updated: August 20, 2015 02:22 IST

विस्मृतीच्या गर्तेत जात असणाऱ्या मोडी लिपीला पुनरुज्जीवित करण्यासाठी मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड यांच्या वतीने गेली सलग ५ वर्षे प्रयत्न केले जात आहेत

पुणे : विस्मृतीच्या गर्तेत जात असणाऱ्या मोडी लिपीला पुनरुज्जीवित करण्यासाठी मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड यांच्या वतीने गेली सलग ५ वर्षे प्रयत्न केले जात आहेत. वाचता येत नाही म्हणून अडगळीत पडलेली मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे वाचली जाऊन त्यातून इतिहासावर प्रकाश पडावा यासाठी महाविद्यालय अभ्यास वर्ग घेत आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात व इतिहास विभागाच्या प्रमुख श्रुती भातखंडे यांनी ही माहिती दिली. मोडी लिपी ही मध्ययुगीन भारताची अत्यंत महत्त्वाची लिपी होती. बहुसंख्य राजकीय तसेच सामाजिक व्यवहारही याच लिपीतून होत असे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रे याच लिपीतून लिहिलेली आहेत. त्यात शिवकालीन, पेशवेकालीन कागदपत्रांचा समावेश आहे. कालांतराने या लिपीचे महत्त्व कमी झाले. आता तर मोजक्याच काही जणांना ती येते. त्यामुळे असंख्य ऐतिहासिक कागदपत्रे वाचल्याविनाच पडून आहेत. ती वाचली जावी यासाठी महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.मोडी लिपीच्या अभ्यासकांकडून यात त्या लिपीचे वाचन व लेखन शिकवले जाते. मागील ५ वर्षांपासून असा वर्ग घेतला जातो व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेळचा वर्ग शनिवार, २२ आॅगस्ट ते रविवार १३ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवार व रविवार दुपारी १२ ते २ या वेळात महाविद्यालयात (गणेशखिंड रोड, पुणे) होणार आहे. सहभागासाठी वयाची अट नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने मोडी लिपीतील बाराखडीचे पुस्तक देण्यात येते, तसेच वर्गाच्या अखेरीस प्रमाणपत्रही मिळते. प्रवेशशुल्क आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)