शाळेतील रागाची 16 वर्षानंतर आठवण, भररस्त्यात शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 20:27 IST2021-10-27T20:24:17+5:302021-10-27T20:27:44+5:30

कांबळे घरात गेले असता विकी व त्याचा मित्र घरात शिरुन त्यांनी लाकडी बॅटने अमोल यास डोळ्यास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले

revenge after 16 years school beatings crime news | शाळेतील रागाची 16 वर्षानंतर आठवण, भररस्त्यात शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण

शाळेतील रागाची 16 वर्षानंतर आठवण, भररस्त्यात शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण

ठळक मुद्देपाठीवर व हातावर मारहाण करुन केले जखमीआता सापडला तुला सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण

पुणे : शाळेत शिक्षण घेत असताना वर्गातील मुलाने मारले होते. त्याचाच बदला एकाने तब्बल १६ वर्षाने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १६ वर्षाचे कालावधीनंतर एकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्या वर्गातील मुलाला रस्त्या गाठून तसेच राहते घरात शिरुन त्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील औंध परिसरात एम्स हॉस्पिटलसमोर घडला. याप्रकरणी चतृश्रृंगी पोलीस ठाण्यात विकी शिरतर व त्याचा अनोळखी मित्र यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल अंकुश कांबळे (वय ३३, रा.पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अमोल कांबळे हे २४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याचे सुमारास घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या विकी शिरतर नावाचे इसमाने त्यांना थांबवून, मला ओळखले का अशी विचारणा केली. त्यावेळी अमोल याने तू आणि मी सोबत एका वर्गात शिक्षण घेत होते असे म्हणाल्यानंतर, विकीने त्यास तू मला शाळेत असताना खुप मारत होता. आता सापडला तुला सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कांबळे घरात गेले असता विकी व त्याचा मित्र घरात शिरुन त्यांनी लाकडी बॅटने अमोल यास डोळ्यास, पाठीवर व हातावर मारहाण करुन जखमी केले.

Web Title: revenge after 16 years school beatings crime news