ट्रस्टींनी घेतलेली रक्कम गोखलेंना परत करा; त्यांच्या पैशांवर आमचा हक्क नाही - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:55 IST2025-10-28T15:54:13+5:302025-10-28T15:55:25+5:30
जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी अशी मागणी धंगेकरांनी केली होती

ट्रस्टींनी घेतलेली रक्कम गोखलेंना परत करा; त्यांच्या पैशांवर आमचा हक्क नाही - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज
पुणे : जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे. विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोंचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असे सांगून जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी विशाल गोखले यांचेही कौतुक केले आहे.
 
जैनमुनी म्हणाले, ट्रस्टी यांच्याकडून आत्तापर्यंत काही आलं नाही, विशाल गोखले ने विशालता दाखवली आहे. ट्रस्टी यांनी भगवान महावीर यांच्याकडे बघून योग्य भूमिका घ्यावी. ट्रस्टी यांनी घेतलेली रक्कम विशाल गोखले यांना परत करा. विशाल गोखले यांचे पैसे यावर आमचा हक्क नाही. गोखलेची संपत्ती जी गेली आहे त्याचे पूर्ण पैसे ट्रस्टी ने परत केले पाहिजे. हा व्यवहार बोगस झाला आहे. यात मूळ गुन्हेगार ट्रस्टी आहेत त्यांनीच सगळ्या पापांचे प्रायश्चित केलं पाहिजे. 
धंगेकरांनी केली होती रक्कम गोठवण्याची मागणी
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता. त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी अशी मागणी धंगेकर यांनी केली होती.