शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीची बाकी व्याजासह द्या

By admin | Updated: January 28, 2015 02:23 IST

सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामातील न दिलेल्या एफआरपीबाबतच्या लढ्याला शेतकरी कृती समितीला यश आले आहे

सोमेश्वनगर : सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामातील न दिलेल्या एफआरपीबाबतच्या लढ्याला शेतकरी कृती समितीला यश आले आहे. गतवर्षी न दिलेली एफआरपी १२१ रुपये व्याजासह देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या २०१३-१४ च्या एफआरपीबाबत शेतकरी कृती समितीने आक्षेप घेतला होता. याबाबत शेतकरी कृती समितीचे प्रमुख सतीश काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार गेल्या सव्वा वर्षापासून २०१३-१४च्या एफआरपीबाबत सुनावण्या सुरू होत्या. तत्कालीन आयुक्तांनी १७ जुलै २०१४ रोजी ही एफआरपी २२५७ प्रतिटन बरोबर असल्याचा आदेश दिला. त्यावर व्याजाची आकारणी करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांना दिले होते. त्यावर तत्कालीन साखर आयुक्तांची बदली झाली. त्यानंतर एफआरपीच्या निर्णयासाठी २ सुनावण्यांमध्ये निकाल होणे अपेक्षित होते. मात्र, साखर आयुक्तांनी ५ ते ६ सुनावण्या घेतल्या. त्यामुळे निर्णय २ ते ३ महिने लांबला. २ डिसेंबर २०१४ रोजी साखर आयुक्तांनी प्रादेशिक सहसंचालकांना २२५७ एफआरपी ग्राह्य धरून आरआरसी प्रस्ताव करण्यासाठी सुधारित व्याज आकारणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी लेखा परीक्षक देशमुख यांचा व्याज आकारणीच्या अभिप्रायासह साखर आयुक्तांना खुलासा सादर केला. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाने श्री सोमेश्वर कारखान्याचा खुलासा मागविला. परंतु, कारखान्याने याबाबत कोणतीही पूर्तता केली नाही. त्यामुळे २३ जानेवारी २०१४ रोजी थकीत एफआरपीबाबत आदेश दिला. या निर्णयाचे शेतकरी कृती समितीने स्वागत केले आहे. दरम्यान, साखर आयुक्तांनी शेतकरी कृती समितीने दिलेल्या सोमेश्वर कारखान्याबाबत असलेल्या तक्रारीवर निकाल होण्यासाठी सहसंचालकांना आदेश द्यावेत, अशी मागणी कृती समितीने करण्यात आली आहे.(वार्ताहर)