शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:00 IST

६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले

बारामती : राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील संच मान्यतेमधील त्रुटी दूर करण्यासाठी तोडगा काढू,असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतली, १५ मार्च २०२४ रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यतेत दुरुस्ती करावी,अशी आग्रही मागणी केली. यावेळी सुधारित संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेले शिक्षक व त्याचा पुढील काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबतची माहिती शिक्षण मंत्री यांना देण्यात आली. 

राज्यभरातील शाळांमध्ये सुधारित संच मान्यतेमुळे झालेले परिणाम समजून घेऊन आवश्यक निर्णय तातडीने घेऊ असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच आधार कार्ड व्हॅलिड बाबत तहसीलदार यांच्याकडून उपाय योजना केली जाईल व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची खात्री करून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीEducationशिक्षणministerमंत्रीStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक