शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारे पुणे विद्यापीठात संशाेधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:37 IST

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे.

पुणे : एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे. या दाेन्ही संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या अशा ‘स्कॅफोल्ड् / मॅट्रीक्स अटॅचमेंट रिजन्सचा (SMAR - स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्स, कर्करोग यासारख्या गंभीर व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या ‘रेट्रोव्हायरस’ कुळातील विषाणूच्या संसर्गाचा असलेला नेमका संबंध शोधून काढण्याची कामगिरीही केली आहे. अशा प्रकारचा संबंध जगात पहिल्यांदाच शोधण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र विभागातील डॉ. अभिजीत कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. स्मृती मित्तल, पुण्यातील राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) व कोलकाता येथील भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थेचे (आयआयसीबी) डॉ. समित चट्टोपाध्याय यांच्यासह विद्यार्थी संशोधक नितीन नरवडे, सोनल पटेल व आफताब आलम यांच्या गटाने हे संशोधन केले आहे. याबाबतचा संशोधन प्रबंध अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या “न्युक्लिक अॅसिडस् रीसर्च जर्नल”मध्ये जून २०१९ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन समुदायाचीही अधिमान्यता मिळाली आहे.

नेमके संशोधन काय?हे संशोधन गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशोधकांनी ‘बायोलॉजिकल डेटा मायनींग’ करत म्हणजेच उपलब्ध असलेल्या नोंदी मिळवून उपयोग करून संपूर्ण मानवी जिनोममधील महत्वाचा घटक असलेल्या ‘स्मार’चा आराखडा तयार केला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये एचआयव्ही (एड्ससाठी कारणीभूत ठरणारा) व एचटीएलव्ही (कर्करोगासाठी करणीभूत ठरणारा) यासारख्या विषाणूंची लागण असणाऱ्या १२ लाख नमुन्यांचा अभ्यास केला आहे. संशोधकांनी या नमुन्यांचे विश्लेषण करताना हा विषाणू आणि मानवी डीएनएच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेचा संबंध बारकाईने अभ्यासला. त्याद्वारे हे घातक विषाणू मानवी ‘स्मार’ आणि त्यांच्या त्रिमितीय संरचनेत कसे व कुठे प्रवेश करतात याचा उलगडा केला. त्यामुळे आता या विषाणूंच्या माणसाच्या डीएनए मधील शिरकावाबद्दल महत्वाची माहिती पहिल्यांदाच जगापुढे आली आहे.

संशोधनाचा उपयोग काय ?· हे संशोधन एड्ससारख्या विषाणूजन्य आजारावरील तसेच, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल.

· मानवी जिनोमची कार्यपध्दती समजून घेण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे.

· भविष्यात जीवशास्त्रामधील अनेक क्लिष्ठ प्रश्न सोडविण्यासाठी जैवमाहितीशास्त्र उपयुक्त ठरत आहे व ते पुढेही अधिक उपयुक्त ठरेल, अशी माहिती या   टीममधील संशोधक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.

“न्युक्लिक अॅसिडस रीसर्च जर्नल”चे महत्वहे संशोधन ‘न्युक्लिक अॅसिडस रिसर्च जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ते विज्ञान संशोधनासाठीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय महत्वाचे जर्नल मानले जाते. त्याचा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ ११.१५ इतका आहे. यावरून या संशोधनाचे महत्व स्पष्ट होते. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणेEducationशिक्षणscienceविज्ञान