शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार करणार कचरा विघटनांवर संशोधन

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून, महापालिकेने कोट्यवधीचे प्रकल्प उभारल्यानंतरही समस्या कायम आहे. त्याचा नाहक त्रास पुणेकरांबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांना होत आहे.

प्रियांका लोंढे ल्ल पुणेशहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून, महापालिकेने कोट्यवधीचे प्रकल्प उभारल्यानंतरही समस्या कायम आहे. त्याचा नाहक त्रास पुणेकरांबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांना होत आहे. त्यामुळे पुणे महापालिका कामगार युनियनच्या सफाई कामगारांनी कचरा वर्गीकरण, विघटन व खत बनविण्यासाठी संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातून रोज सुमारे १६०० टन कचरा निर्माण होतो. सध्या स्थितीत ७० ते ८० टक्के कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी गावाच्या हद्दीत उघड्यावर डंपिंग केला जातो. त्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ कचरा टाकण्यास विरोध करीत असून, अनेकदा आंदोलन करून कचरा डंपिंग बंद केले जाते. त्यामुळे विविध भागांत कचरा साचून राहतो. अस्ताव्यस्त कचऱ्याने दुर्गंधी पसरते. मग, नागरिकांकडून सफाई कामगारांना शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यावर महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांनी उपायोजना म्हणून सुमारे १००० टनाचा कचराप्रक्रिया प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्चून उभारला. मात्र, हा प्रकल्प बंद पडला आहे. महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून प्रभागात जिरविण्याची योजना सुरू केली. परंतु, नागरिकांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. मिश्र कचरा नागरिक प्लॅस्टिक पिशवीतून थेट कंटेनेरमध्ये टाकतात. कचऱ्यामध्ये मिथेन व कार्बन डायआॅक्साईडसारखे धोकादायक वायू असतात. मात्र, नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण व विघटन करीत नसल्याने सफाई कामगारांना समस्येला सामोरे जावे लागते. यापूर्वी दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या ‘कचराकोंडी’ व ‘सत्यशोधक नाटका’मध्ये पुणे युनियनच्या कामगारांनी उत्कृष्ट काम केले आहे. मग, आपण संशोधनात मागे का? कोणीतरी येऊन आपली समस्या सोडवेल, याची वाट न पाहता युनियनच्या सफाई कामगारांनी कचरा विघटनावर संशोधन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली संशोधन सहकारी (इंडसर्च) संस्था संशोधनासाठी मदत करणार आहे. त्यासाठी प्रशासन, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील डॉ. आनंद करंदीकर, डॉ. मिलिंद भोई, डॉ. अर्चना मोरे, माजी महापालिका आयुक्त रमानाथ झा व डॉ. प्रेरणा राणे आदी १३ जणांची पहिली तज्ज्ञांची टीम कचरा विघटनाच्या संशोधनासाठी सफाई कामगारांना मदत करणार आहे. त्यासाठी कामगारांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी दिली.कचऱ्याच्या समस्येविषयी सर्वजण बोलतात, पण कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या कचरा वेचकांच्या आरोग्याविषयी कोणीच बोलत नाही. कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परंतु, अनेक वर्षे दुर्लक्षित घटकाने स्वत:ची समस्या संशोधन करून स्वत:च सोडविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी समाजातील याविषयांत काम करणाऱ्यांना आम्ही कचरा विघटन संशोधनात मदतीसाठी आवाहन केले आहे.- मुक्ता मनोहर, ज्येष्ठ कामगार नेत्या