कदमवाकवस्ती परिसरातील मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील २७ जण तपासणीसाठी पुण्याला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:39 PM2020-05-02T14:39:14+5:302020-05-02T14:41:25+5:30

संबधित महिलेवर उपचार चालु असताना गुरुवारी मध्यरात्री संबधित महिलेचा मृत्यू

Report of dead woman in Kadamwakvasti area corona positive; 27 contacts people in Pune for test | कदमवाकवस्ती परिसरातील मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील २७ जण तपासणीसाठी पुण्याला 

कदमवाकवस्ती परिसरातील मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील २७ जण तपासणीसाठी पुण्याला 

Next
ठळक मुद्देमृत्युनंतर खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेची केली कोरोना टेस्ट

पुणे : कदमवाकवस्ती ह्द्दीतील माळवाडी येथील एका महिलेला मागील कांही दिवसांपासुन मूत्राशयाचा त्रास सुरु असल्याने बुधवारी (दि. २९)तिला दुपारी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालु असताना गुरुवारी मध्यरात्री संबधित महिलेचा मृत्यू झाला. मृत्युनंतर खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेची कोरोना टेस्ट केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 
     दरम्यान, माळवाडी येथील मृत्युमखी पडलेली महिला कोरोना बाधित असल्याचे समोर येताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या माळवाडी येथील तब्बल सत्तावीस जणांना तातडीने माळवाडी परिसरातील नागरिकांपासुन वेगळे केले आहे. त्यांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील सर्वांना पुणे येथील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. के. जाधव यांनी दिली. 
      याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, आशा वर्करनी तीनच दिवसांपूर्वी माळवाडी परिसरातील घरोघरी जाऊन माहिती घेतली होती. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी महिला आजारी असल्याबाबत कसलीही माहिती दिली नव्हती. मात्र, बुधवारी मुत्राशयाचा त्रास सुरु झाल्याने, संबधित महिलेला हडपसर येथील रुग्नालयात दाखल केले होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, ग्रामपंचायतीने माळवाडी व परिसर निर्जंतुकीकरण करुन घेतले आहे. तसेच हा भाग पूर्णपणे सील केला असुन, महिलेच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस जणांची कोरोना टेस्ट करण्यासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे. तसेच संबधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले का याची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पुर्व हवेलीत भीती वाढली..
दरम्यान गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत उरुळी कांचन येथील एका महिलेसह चार जण कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले आहे. या चार जणांत सत्तेचाळीस वर्षीय महिला, संबधित महिलेवर उपचार करणारे कदमवाकवस्ती येथील खाजगी रुग्णालयातील एक डॉक्टर, दोन नर्सचा समावेश आहे. वरील डॉक्टर व महिलेच्या संपर्कात आलेल्या सव्वाशेहुन अघिक जण क्वारंटाईन असतानाच, माळवाडी येथील येथील महिलेचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आल्याने पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Report of dead woman in Kadamwakvasti area corona positive; 27 contacts people in Pune for test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.