११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:05 IST2025-09-13T16:04:36+5:302025-09-13T16:05:24+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसून येऊ लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि धक्कादायक सत्य बाहेर आले.

Repeated assault on 11th grade girl Girl 7 months pregnant shocking incident in Loni Kalbhor area | ११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना

११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गातील 17 वर्षीय मित्राने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी तब्बल सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतरच हा प्रकार उघड झाला.

घटनेनंतर लोणी काळभोरसह संपूर्ण भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलीसांनी तत्काळ अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी दोघेही एकाच नामांकित शैक्षणिक संकुलात शिकत होते. शाळेत जाणे-येणे, एकत्र अभ्यास करणे या कारणामुळे त्यांच्यात जवळीक वाढली. सुरुवातीला निरागस वाटणारे हे नाते कालांतराने चुकीच्या मार्गाने गेले.

जानेवारी 2025 मध्ये दोघे अभ्यासासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले असता आरोपीने तिला खोलीत नेऊन पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर धमकावून आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपीने पुन्हा पुन्हा असेच कृत्य केले. जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसून येऊ लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि धक्कादायक सत्य बाहेर आले. यानंतर पीडितेच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई सुरू केली असून तो अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्याअंतर्गत प्रक्रिया राबवली जात आहे. पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत तसेच वैद्यकीय तपासणी अहवालही पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे.

Web Title: Repeated assault on 11th grade girl Girl 7 months pregnant shocking incident in Loni Kalbhor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.