शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 19:06 IST

पुण्याइतकी वृक्ष विविधता दुसऱ्या कुठल्याही शहराला लाभलेली नाही.

पुणे :  पुण्यात ५३० वृक्षांच्या जातींची नोंद झाली आहे. अशी वृक्ष विविधता‌ कुठल्याही शहराला लाभलेली नाही. यापैकी २०० हून जास्त वृक्ष दुर्मिळ जातींचे आहेत. या जाती लावण्यामध्ये अनेक वृक्षप्रेमींचे प्रेरणादायी योगदान आहे.

कर्वेनगरमधील आमोद साने यांच्या मित्रमंडळाने अनेक वर्षांपूर्वी कर्वेनगरमधील रस्त्यांवर तब्बल २५० दुर्मिळ वृक्ष लावले होते. यापैकी २ 'वरुण' वृक्षांवर प्रचंड बांडगुळे वाढल्यामुळे ते मरणासन्न झाले होते. निसर्ग अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी टेलस संस्थेच्या लोकेश बापट यांच्या मदतीने ही बांडगुळ काढून वृक्षांना जीवदान दिले.   

दुर्दैवाने या वरुण वृक्षांचा नवसह्याद्री सोसायटीतला तिसरा भाउबंद मात्र २ वर्षांपूर्वीच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बळी पडला. तिथल्या रस्त्यावरचा झाडलेला पालापाचोळा या सुंदर वरुण वृक्षाच्या तळाशी रचला जात असे आणि पेटवला जात असे. शोकांतिका अशी की वरुण म्हणजे पावसाचा देव, तोच या निष्काळजीपणे लावलेल्या आगीत जळून नष्ट झाला.

रस्त्यावरच्या दुर्मिळ झाडांना काही धोका निर्माण होत असेल तर तो दूर करून झाडे वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. सुजाण नागरिकांनी आपापल्या भागातल्या झाडांवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. काही शहरांमध्ये अश्या काळजीवाहकाचे नाव आणि फोन नंबर दिलेले फलक लावतात. पुण्यातील वृक्षप्रेमी संस्थांनी ही संकल्पना लोकप्रिय करावी.दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वा-यात अनेक झाडे उन्मळून पडतात, जीवितहानी होते, वाहनांचे नुकसान होते. अशा अपघाता नंतर 'कशी परदेशीच झाडे पडतात' याची चर्चा करण्याऐवजी  झाडाला आधार देणे, कुजलेल्या धोकादायक फांद्या वेळीच उतरवणे महत्वाचे आहे. खोड आतून किडले आहे का याची तपासणी केली तर अपघात टाळता येतात. हे वृक्षांपासून होणारे धोके‌ झाले.

वृक्षांना होणारे धोके पुढीलप्रमाणे आहेत. खोडाच्या तळाशी डांबर, काॅक्रीट किंवा ठोकळे गच्च बसवल्यामुळे मुळांना हवा, पाणी अन्न न मिळाल्याने झाड कमकुवत होते. झाडाचा अन्नपुरवठा सालीतून होतो त्यामुळे साल कापल्यास किंवा खोडावर तार दोरी बांधल्यास झाडाची वाढ खुंटते. झाड लावताना बसवलेले लोखंडी पिंजरे नंतर काढले जात नाहीत, ते खोडांमध्ये शिरून झाड विद्रूप आणि कमकुवत होते. झाडाखाली कचरा जाळणे अतिशय गैर आहे.

केवळ उद्यान विभागाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी झाडामुळे आणि झाडाला होणारे धोके नियमित देखभाल करून टाळले तर पुणे शहर जैवविविधते खेरीज वृक्षप्रेमासाठी कौतुकाने ओळखले जाईल.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण