रेमडेसिविरचे वितरण आरोग्य यंत्रणेकडून करावे: अशोक पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:00+5:302021-04-11T04:11:00+5:30
कदमवाकवस्ती (लोणी काळभोर, ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार पवार यांनी ...

रेमडेसिविरचे वितरण आरोग्य यंत्रणेकडून करावे: अशोक पवार
कदमवाकवस्ती (लोणी काळभोर, ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार पवार यांनी केले. यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, हवेली पंचायत समितीचे सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी डाॅ. डी. जे. जाधव उपस्थित होते.
अशोक पवार पुढे म्हणाले की, पूर्व हवेलीतील बहुतांश गावांची कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरू पहात आहेत. आपण सर्वांनी काळजी न घेतल्यामुळे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मृत्यूदर ही वाढला आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.
१० लोणी काळभोर पवार
कोविड सेंटर उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले अशोक पवार, सचिन बावरकर, विजयकुमार चोबे, अर्चना कामठे व इतर.