शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:40 IST

आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे.

मंचर : प्रकृतीच्या कारणास्तव तसेच मतदारसंघाला अधिकचा वेळ देता यावा, यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपद घेतले नसल्याची चर्चा होत आहे.आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांना विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख करण्यात आले होते. १९९७-९८ साली विधानसभेतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने वळसे पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९९ साली त्यांना सर्वप्रथम मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली उच्च व तंत्र शिक्षण खात्याबरोबरच ऊर्जा खात्याची जबाबदारी आली.२००३ साली ऊर्जा व तंत्र शिक्षण खात्याचे ते मंत्री होते. २००८ साली ते वित्त व नियोजन खात्याचे मंत्री होते. २००९ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रभावी कामकाज केले. या काळात विधानमंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात विविध मंत्रिपदे सांभाळत असताना वळसे पाटील यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळात वळसे पाटील नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मंत्रिपद नाकारल्याची चर्चा सुरू आहे. मतदारसंघात अधिकचा वेळ देता यावा, हा हेतूसुद्धा आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर कामाच्या व्यापात मतदारसंघात फिरता येत नाही मग काही प्रमाणात रोष निर्माण होतो हे सुद्धा मंत्रिपद न घेण्याचे एक कारण असावे.दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्याचा इन्कारही केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खंबीर साथ दिली आहे. महायुती सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादीमधील पहिल्या फळीतील ते नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही निर्णय घेताना वळसे पाटील यांच्याशी सल्लामसलत केली जाते. प्रकृतीमुळे वळसे पाटील मंत्रिपद घेणार नाहीत, अशी चर्चा यापूर्वी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्याचा इन्कारही केला होता. मात्र आज झालेली घडामोड पाहता, यावेळी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय हा खुद्द वळसे पाटील यांचाच असल्याची चर्चा होत आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच उलगडा होईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुतीMantralayaमंत्रालय