शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेडच्या ५७३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भामा आसखेडच्या १४१४ प्रकल्पग्रस्तांपैकी आजही तब्बल ५७३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झाले नसल्याचे समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भामा आसखेडच्या १४१४ प्रकल्पग्रस्तांपैकी आजही तब्बल ५७३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झाले नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय गावठाण विकासाचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असलेला भामा आसखेड प्रकल्पाच्या उद्घाटनाचा घाट घातला गेला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावताच येथील पाणी शहरात आणण्याची घाई राजकीय असल्याचा संशय यातून निर्माण झाला आहे.

भामा आसखेड प्रकल्पामुळे खेड तालुक्यातील आठ-दहा गावातील शेकडो शेतकरी प्रकल्पग्रस्त झाले. त्यात शासनाने भामा आसखेडचे सिंचन क्षेत्र रद्द करून संपूर्ण पाणीसाठा पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला. यामुळे ‘आमच्या शेतीला पाणीच मिळणार नाही,’ असे सांगत हवेली, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार दिला. यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी हेक्टरी पंधरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन्ही महापालीकांकडून पैसे वाटपासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला निधी दिला. यामुळेच आत्तापर्यंत ६४० प्रकल्पग्रस्तांना ७४ कोटी रुपयांचे वाटप केले. तर २०१ प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात आले. अद्यापही ५७३ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन बाकी असल्याने या सर्वांना प्रशासनाने नोटीसा काढल्यास आहेत.

चौकट

जमीन देणे अशक्य; प्रकल्पग्रस्तांनी पैसे घ्यावे

“भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना शासनाने निश्चित केल्यानुसार हेक्टरी १५ लाख देण्यात येत आहे. त्यानुसार ६४० लोकांना ७४ कोटींचे वाटप केले आहे. शिल्लक ५७३ पैकी १७७ लोकांनी देखील पैसे घेण्याची तयारी दाखवली आहे. परंतु शिल्लक ३९६ लोक आजही जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी असा आग्रह धरत आहेत. पण आता जमीन देणे शक्य नाही. यामुळेच शासन नियमानुसार पैसे स्विकारा, अशी नोटीस सर्वांना दिली आहे. ग्रामपंचायत आचारसंहितेनंतर गावांमध्ये शिबिर घेऊन पैसे वाटप करण्यात येणार आहे.”

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी