Pune: सिगारेट आणून देण्यास नकार, तरुणाला चाेपले; दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Published: January 30, 2024 06:13 PM2024-01-30T18:13:08+5:302024-01-30T18:14:04+5:30

दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Refusal to bring cigarettes, youth beaten; A case has been registered against both of them in Kondhwa Police Station | Pune: सिगारेट आणून देण्यास नकार, तरुणाला चाेपले; दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune: सिगारेट आणून देण्यास नकार, तरुणाला चाेपले; दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : ‘तू मला भगवा चौक येथून सिगारेट आणून दे असे सांगणाऱ्याला नकार दिल्याच्या रागातून तरुणाला शिवीगाळ व बांबूने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमर (वय १९) व इम्रान (वय २३, रा. कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शाहीद याकूब शेख (वय १९ रा. शिवनेरी नगर गल्ली नं ८, कोंढवा खुर्द) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहतात. फिर्यादी हा मित्रांबरोबर मोबाइलमध्ये गेम खेळत बसला होता.

आरोपी फिर्यादीच्या जवळ आले आणि त्यांनी ‘तू मला मला भगवा चौक येथून सिगारेट आणून दे,’ असे सांगितले. त्यावेळी फिर्यादीने नकार दिला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. फिर्यादीचे मित्र भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांच्यावर विटा फेकून त्यांना जखमी केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Refusal to bring cigarettes, youth beaten; A case has been registered against both of them in Kondhwa Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.