अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:14 IST2025-12-08T13:14:22+5:302025-12-08T13:14:35+5:30

ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे

Refund passengers' full money without charging additional fees; Muralidhar Mohol orders IndiGo company | अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांचे पूर्ण पैसे परत करा; मुरलीधर मोहोळ यांचे ‘इंडिगो’ कंपनीला आदेश

पुणे : विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा, असे स्पष्ट निर्देश ‘इंडिगो’ कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चितपणे केली जाईल. चौकशी अहवालानुसार ज्याची चूक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

इंडिगो’ या विमान कंपनीच्या नियोजनातील गोंधळामुळे गैरसोयींचा सामना करावा लागलेल्या प्रवाशांच्या तिकिटाचा परतावा आणि साहित्य परत करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पत्रकारांना दिली. विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत तिकीट दरांवर मर्यादेसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.

इतर विमान कंपन्यांनी वाढविलेल्या तिकीट दरांवर नियंत्रण आणले आहे. ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. स्थिती त्वरित सुधारण्यासाठी ‘फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

Web Title : अतिरिक्त शुल्क के बिना यात्रियों को पूरा पैसा वापस करें: मोहोल का इंडिगो को आदेश

Web Summary : मंत्री मोहोल ने इंडिगो को उड़ान व्यवधानों के कारण यात्रियों के टिकट का पूरा पैसा बिना किसी अतिरिक्त शुल्क के तुरंत वापस करने का आदेश दिया। एक समिति मामले की जांच कर रही है और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई का वादा किया गया है। किराए को नियंत्रित करने और यात्रियों को होने वाली असुविधा को रोकने के लिए उपाय किए गए हैं, जिसमें उड़ान ड्यूटी समय सीमा को अस्थायी रूप से निलंबित करना शामिल है।

Web Title : Refund full amount to passengers without extra charge: Mohol to Indigo.

Web Summary : Minister Mohol ordered Indigo to promptly refund passengers' tickets without extra charges due to flight disruptions. A committee is investigating the matter, promising strict action against those at fault. Measures are in place to control fares and prevent passenger inconvenience, including temporarily suspending flight duty time limitations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.