शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरशांचा भुलभुलैया अन् संगीतविश्वाची ओळख

By admin | Updated: May 21, 2015 01:48 IST

पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रत्यक्ष करून देत असल्याचा भास होतो आणि या अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून साधलेली किमया मनाला थक्क करते.

पुणे : शास्त्रीय गायन, सनई, सतार, सरोद, बासरी यांतून संगीताचे सूर आळवत संगीतप्रेमींच्या मनाला गवसणी घालणाऱ्या दिग्गज कलाकारांची ओळख पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया हे प्रत्यक्ष करून देत असल्याचा भास होतो आणि या अनोख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून साधलेली किमया मनाला थक्क करते.या गोष्टी अनुभवायला येतात त्या सहकारनगर परिसरातील वसंतराव बागुल उद्यानात पंडित भीमसेन जोशी कलादालनात साकारलेल्या ‘कलाकारों की कहानी संगीतकारों की जुबानी’ या उपक्रमात! छोट्यांसाठी हा माहिती आणि आनंदाचा मोठा खजिनाच यातून उपलब्ध होणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगीतविश्वाची माहिती करून कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. कलादालनात प्रवेश करताच ए. आर. रेहमान यांच्या हुबेहूब प्रतिमेने आपले स्वागत होते. शास्त्रीय गायन, सनई, तबला, सतार, सरोद, बासरी यांतून संगीताचे सूर आळवत कार्यक्रमाची सुरुवात होते. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, सतारवादक पं. रविशंकर, सनईवादक पं. बिस्मिल्ला खॉँ, तबलावादक उस्ताद अहमदजान थिरकवा खॉँ यांची ओळख पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या आवाजात ऐकायला मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेली ही किमया थक्क करते. याकरिता शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरासिया यांनी सहकार्य केले असून, त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.(प्रतिनिधी)४संगीताचा कार्यक्रम श्रवण केल्यानंतर आरशांचा भुलभुलैया हे दालन वेगळ्याच विश्वात नेऊन सोडते.४ तिथे आतमध्ये गेल्यानंतर आरशामध्ये आपण रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतो; पण पूर्णपणे गोंधळून जातो. ४पडदा हालला की आपल्याला जाणवते की आपण पिंजऱ्यात उभे आहोत. रंगीबेरंगी लाईट इफेक्टमुळे वेगळा अनुभव मिळतो. दरीवरील हलणारा पूल, खोल दरी, अचानक अंगावर येणारा डायनासॉर, काळी गुंफा, खुनी दरिंदा, घाबरविणारे ध्वनी आदींचा अनुभव मिळतो. संकटांना न घाबरता त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण स्वत: रस्ता शोधला पाहिजे. धैर्य, जिद्द, कल्पकता व आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण झाला पाहिजे, अशी या दालनाची निर्मिती करण्यामागची संकल्पना आहे.- आबा बागुल, उपमहापौर