शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मंदीतही आरटीओची झाली चांदी

By admin | Updated: October 23, 2015 03:34 IST

बाजारपेठेत असलेल्या मंदीच्या वातावरणामुळे त्याचा फटका नवीन वाहन नोंदणीस बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, १९ ते २२ आॅक्टोबर २0१५ या चार दिवसांच्या कालावधीत

पुणे : बाजारपेठेत असलेल्या मंदीच्या वातावरणामुळे त्याचा फटका नवीन वाहन नोंदणीस बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, १९ ते २२ आॅक्टोबर २0१५ या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल ३ हजार ७७३ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या चार दिवसांच्या कालावधीत २ हजार ८९२ नवीन वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, आपली नवीन वाहने घेण्यासाठी शहरातील वाहनांच्या शोरूमबाहेर नागरिकांनी आज रांगा लावल्या होत्या. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नवीन वाहन खरेदी करतात. मंदीच्या वातावरणामुळे तसेच राज्यावरील दुष्काळाच्या सावटामुळे या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत नवीन वाहन नोंदणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रत्यक्षात मागील वर्षीपेक्षा ही नोंदणी २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून आले. या वर्षी एकूण ३ हजार ७७३ वाहनांची नोंद झाली असून, त्यात सर्वाधिक २५५३ दुचाकी आहेत, तर त्याखालोखाल चारचाकी वाहने असून, त्यांची संख्या १0९४ आहे. तर ७२ मालवाहू वाहणे असून, १३ प्रवासी बसेस तर ५४ टूरिस्ट टॅक्सी आहेत. तर अवघ्या ७ रिक्षा आहेत. दरम्यान, या वाहन नोंदणीमधून आरटीओला ४ लाख २५ हजार २२0 रुपयांचे नोंदणी शुल्क मिळाले आहे. तर करापोटी तब्बल ११ कोटी ५ लाख ६५ हजार ६७0 रुपयांचा महसूल मिळालेला आहे.रिक्षा कमी चारचाकी अधिकमागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी नवीन वाहनांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. तर, उत्पन्न दुपटीने वाढले आहे. मात्र, या वर्षी रिक्षांची संख्या कमालीची घटली असून, चारचाकी वाहनांची तसेच टूरिस्ट टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे ५९७ चारचाकी वाहनांची नोंद झाली होती. तर या वर्षी हा आकडा १0९४ वर पोहोचला आहे, तर मागील वर्षी ७७ रिक्षांची नोंदणी झाली होती. या वर्षी हा आकडा ७ वर पोहोचला आहे, तर दुसरीकडे प्रवासी बसेसची संख्या मागील वर्षी 88 जोती हा आकडा या वर्षी 13 वर पोहचला आहे. तर मालवाहू वाहनांची संख्याही मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी घटली आहे.