शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या बैठकीकडे राजकीय पक्षांची पाठ

By admin | Updated: October 2, 2014 23:33 IST

निवडणूक काळादरम्यान होणा:या प्रचार सभांसाठी लागणा:या मैदानांचा प्रश्न आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांनी पाठ फिरवली.

पुणो : निवडणूक काळादरम्यान होणा:या प्रचार सभांसाठी लागणा:या मैदानांचा प्रश्न आणि सुरक्षेच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलावलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांनी पाठ फिरवली. पुणो शहर पोलिसांनी बोलावलेल्या या बैठकीला केवळ दोनच पक्षांचे चार पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक शांततेत आणि अनुचित प्रकारांशिवाय पार पडावी, याकरीता पोलिसांचे एकतर्फी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या 4 तारखेला पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय पक्षांना प्रचार सभा घेण्यासाठी मैदाने देण्यास मध्यवर्ती भागातील महाविद्यालये आणि शाळांनी नकार दिला होता. नदीपात्र वगळता शहराच्या मध्यवस्तीत शाळा व महाविद्यालयांची मैदाने वगळता मोठी मैदाने नाहीत. यासोबतच पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसमोर सभा घेण्यासाठी मैदानांचा प्रश्न उभा राहणारच आहे. काही पक्षाच्या उमेदवारांनी सभांसाठी शाळा आणि महाविद्यालयांशी बोलणी सुरू केलेली असली, तरीदेखील पोलिसांना त्याबाबत निश्चित काहीच सांगण्यात आलेले नाही. वाहतूक आणि सुरक्षा असे दोन्ही मुद्दे लक्षात घेऊन सभास्थानांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पोलिसांनी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची बैठक बुधवारी आयोजित केली होती. दुपारी चार वाजता होणा:या या बैठकीला पाच वाजेर्पयत कॉँग्रेस आणि मनसेचे जेमतेम चारच पदाधिकारी पोचू शकले. मतदानाचा दिवस जवळ येत चालला असून, प्रचाराला अगदीच कमी वेळ हातामध्ये राहिल्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी अधिकाधिक वेळ प्रचारासाठी देत आहेत. पदयात्र व रॅलींद्वारे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे. प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळेही पदाधिका:यांनी बैठकीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.  (प्रतिनिधी)
 
सभांची परवानगी मागण्यासाठी किमान 48 तास आधी पोलिसांना पत्र देणो आवश्यक आहे. परंतु, अद्याप कोणत्याही सभेसाठी परवानगी मागण्यात आलेली नसून, कोणत्याही राजकीय पक्षाने नियोजित सभांची माहितीही दिलेली नसल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रचारसभांसाठीही बंदोबस्त तैनात करताना पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. ऐनवेळी राजकीय पक्षांकडून सभांची तयारी सुरू झाल्यास पोलिसांची धावपळ होणार, हे स्पष्ट आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी पुन्हा येत्या चार तारखेला राजकीय पक्षांच्या पदाधिका:यांची पोलिसांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तरी राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळतो का, हे पाहणो औत्सुक्याचे ठरणार आहे.