अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 14:10 IST2023-11-26T14:10:07+5:302023-11-26T14:10:39+5:30
कार्यक्रमात मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना आदरांजली वाहण्यात आली

अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
बारामती: संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी जनता दरबारात विविध प्रश्न मांडण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते .मोठ्या गर्दीमुळे काही काळ गोंधळ देखील निर्माण झाला होता. पवार यांच्या आजारपणामुळे अनेक दिवसांनी जनता दरबार पार पडला. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.