छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवा - संदिप ढोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:10+5:302021-02-05T05:05:10+5:30

शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव यांनी आपल्या सदस्यांसह शिवसह्याद्री ट्रेकर्सचा वर्धापन दिन किल्ले शिवनेरी येथे साजरा करण्याचा निर्णय ...

Reach the history of Chhapati Shivaji Maharaj from house to house - Sandeep Dhore | छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवा - संदिप ढोरे

छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवा - संदिप ढोरे

शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव यांनी आपल्या सदस्यांसह शिवसह्याद्री ट्रेकर्सचा वर्धापन दिन किल्ले शिवनेरी येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. गडावर जाऊन जिजामाता व बाल शिवाजी तसेच शिवजन्मस्थळास हार घालुन राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कि जय या घोषणांनी अवघा शिवनेरीगड दुमदुमुन गेला.

गडाच्या पायथ्याशी शिवसह्याद्री ट्रेकर्सचा पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने सुरुवात झाली. यावेळी प्रमुख म्हणून आजाद हिंद संघटनेचे हनुमंत वाबळे, पत्रकार मामासाहेब गायकवाड, उद्योजक पृथ्वीराज ढुमे, माळशिरसचे माजी उपसरपंच दिलीप शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, सीताराम चव्हाण, नितीन इंदलकर, शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव, शिवसह्याद्री ट्रेकर्सचे अध्यक्ष संदीप ढोरे, कार्याध्यक्ष सर्जेराव तोरकडी, उपाध्यक्ष संतोष पानवकर तर शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या सचिवपदी संदीप कोलते, सामाजिक कार्याविभाग अध्यक्षपदी संदीप भापकर, बचतगट अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे यांची नव्याने निवड करण्यात आली. शिवसह्याद्री ट्रेकर्सचे सर्व सदस्य विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पुणे जिल्हा बॅंकेचे अधिकारी जयेश गद्रे स्वागत संस्थापक अध्यक्ष संतोष यादव तर आभार शुभम रोकडे यांनी मानले.

शिवसह्याद्री ट्रेकर्सचा पाचवा वर्धापन दिन किल्ले शिवनेरी येथे साजरा करण्यात आला.

Web Title: Reach the history of Chhapati Shivaji Maharaj from house to house - Sandeep Dhore