शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या कामाची फेरनिविदा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST

दरम्यान, याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यावेळी, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, ...

दरम्यान, याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यावेळी, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, पांडुरंग शिंदे, सागर गानबोटे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, गुड्डू मोमीन हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, इंदापूर शहरातील विकासकामांबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेला आराखडा, प्रत्यक्ष मापे, कागदोपत्री निविदा व प्रत्यक्ष विकासकामे यामध्ये ४० टक्के तफावत आढळत आहे. या सुरु असलेल्या कामांमध्ये अंडरग्राऊंड सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भविष्यात पुन्हा तयार केले काँक्रिटीकरण व रस्ते उकरावे लागणार असल्याने वेळेचा तसेच पैशाचाही अपव्यय होणार आहे. वाढीव कामाची निघणारी रक्‍कम याचा लाभ नक्की कोणाला होणार आहे ? याचा जाब द्यावा. सदर चुकीच्या निविदा रद्द करुन फेर निविदा काढाव्यात अन्यथा इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे.

आमचा कोणत्याही विकासकामास विरोध नाही. परंतु आपण काढलेले टेंडर हे राजकीय दबावापोटी काढल्याचे जाणवत आहे. अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांच्या दबावाला बळी न पडता वाढीव मापे देणाऱ्या भ्रष्ट कारभाऱ्यांची नावे जाहीर करावीत. तसेच चुकीचे इस्टिमेट सादर करणा-या इंजिनिअरवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

बहुजन मुक्ती पार्टीने केले होते फिल्ड सर्वेक्षण

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन मुक्ती पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते संजय (डोनाल्ड) शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी केलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी जावून, प्रत्यक्ष कागदावर असलेले बांधकाम व कामाच्या ठिकाणी असलेले बांधकाम यांचे मोजमाप पट्टी लावून मोजणी केली होती. त्यांनी दिलेले काम आणि केलेले काम या कामात चाळीस टक्के फरक पडतोय, असे सांगितले होते.

१२ इंदापूर नगरपरिषद

इंदापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देताना भाजपाचे कार्यकर्ते.