सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्याने रविंद्र डोके यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सातपैकी चारच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. रवींद्र डोके, सुनंदा दुधवडे, निर्मला डोके, पद्मा शिंदे आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एन. देशमुख यांनी काम पाहिले. या वेळी गावकामगार तलाठी भोसले, ग्रामसेवक एस. टी. रोकडे आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कुमशेत येथे सहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते, तर एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. या निवडणुकीत जय अंबिका परिवर्तनने वर्चस्व राखत जय अंबिका परिवर्तनचे सहा उमेदवारांपैकी चार उमेदवार विजयी झाले. तर ग्रामविकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी दोनच उमेदवार निवडून आले होते.
१२ जुन्नर कुमशेत