रावेतला जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 14:57 IST2021-04-05T14:56:28+5:302021-04-05T14:57:12+5:30

आठ जणांवर गुन्हा दाखल

Ravetla raids gambling den; Twenty-three thousand items confiscated | रावेतला जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त

रावेतला जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

पिंपरी: जुगार अड्ड्यावर छापा टाकून २३ हजार ६० रुपयांची रोकड, तसेच जुगार खेळण्यासाठीचे ५० रुपये किमतीचे पत्ते, असा २३ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रावेत येथे रविवारी ही कारवाई करण्यात आली. 

दामू शिवप्‍पा राठोड (वय ४०, रा. बावधन), गणेश सोमू राठोड (वय ३६ रा. वाकड) व इतर सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी राजेश कोकाटे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रावेत येथील भोंडवे कॉर्नर येथे एका प्लॉटमधील पत्र्याच्या शेड समोरील मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी रविवारी सापळा रचून कारवाई केली. यात २३ हजार ६० रुपयांची रोकड तसेच ५० रुपये किमतीचे जुगाराचे पत्ते, असा एकूण २३ हजार ११० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Ravetla raids gambling den; Twenty-three thousand items confiscated