शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

"रश्मी ठाकरे या गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे यात कधीच पडल्या नाहीत..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 8:25 PM

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला..

ठळक मुद्देअन्यथा किरीट सोमय्या यांनी जाहीर मागावी

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. 

पुण्यात नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. गोऱ्हे म्हणाल्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप केले आहे. त्याबद्दल एका महिन्याच्या कालावधीत पुरावे सादर करावे अन्यथा त्यांनी जाहीर मागावी असे खुले आव्हान देखील सोमय्या यांना दिले आहे.   

यावेळी गोऱ्हे यांनी भाजप नेते राम कदम यांचा देखील खरपूस शब्दात समाचार घेतला. त्या म्हणाल्या, कधीकाळी मुलींना उचलून आणण्यासारखी वक्तव्य करणारे नेतेच आता महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करत आहे. हाच मोठा विनोद आहे. राज्य सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कदापि पाठीशी घालणार नाही. 

किरीट सोमय्यांबद्दलचे वायकरांचे 'ते' वक्तव्य अगदी खरे.. 

किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबियांवर जे काही आरोप करत आहे. किंवा नवनवीन विषय उकरून काढत आहे ते जेवणाच्या ताटातील लोणच्यासारखे आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या आरोपावर नक्कीच एक पुस्तक तयार होईल. त्यांना ज्या मुद्द्यावर आक्षेप तो घेऊन सोमय्या यांनी न्यायालयात जावे. परंतु, किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, हे रवींद्र वायकर यांचे वक्तव्य मला अगदी खरे वाटते आहे.  

नारायण राणे हे वैफल्यग्रस्त...  नारायण राणे हे वैफल्यग्रस्त झाले आहे.  ते दुःखी आत्मा आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळसारखी झाली आहे.  त्यामुळे तोंडी येईल ती बडबड राणे करत आहे, अशा शब्दात गोऱ्हे यांनी दिवाळीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नक्कीच होणार असून ठाकरे सरकार कोसळेल या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmruta Fadnavisअमृता फडणवीसBJPभाजपा