पुणे स्टेशन परिसरातील सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधम रिक्षाचालकाला काही तासातच अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 04:56 PM2021-09-09T16:56:37+5:302021-09-09T16:56:44+5:30

मुलगी आईच्या कुशित झोपली असताना रिक्षाचालकानं तिला उचलून रिक्षात ठेवलं. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीत इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तिला नेऊन बलात्कार केला.

Rape of a six-year-old girl in Pune station area; Naradham rickshaw puller arrested within hours | पुणे स्टेशन परिसरातील सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधम रिक्षाचालकाला काही तासातच अटक

पुणे स्टेशन परिसरातील सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधम रिक्षाचालकाला काही तासातच अटक

Next
ठळक मुद्देपरिसर पिंजून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला मार्केटयार्ड परिसरात केले जेरबंद

पुणे : मागील आठवड्यात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरलं नसतानाच गुरुवारी पहाटे एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नराधम रिक्षाचालकाला काही तासातच बंडगार्डन पोलिसांनीअटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पुणे स्टेशन बस स्थानकालगत मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. पहाटे मुलगी आईच्या कुशित झोपली असताना रिक्षाचालकानं तिला उचलून रिक्षात ठेवलं. यानंतर रिक्षा थेट मार्केटयार्ड येथील एका पडीत इमारतीजवळ नेली. तेथे इमारतीच्या वरच्या मजल्यावर तिला नेऊन बलात्कार केला.

दरम्यान, घरच्यांना जाग आल्यावर मुलगी कुशीत नसल्याचे दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परिसर पिंजून काढला तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत त्याला मार्केटयार्ड परिसरात जेरबंद केले. यानंतर पिडीत मुलीला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे. 

खेड तालुक्यातही १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस

खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली असून तीन फरार झाले आहेत.

पुण्यात मागील आठवड्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार झाला होता 

पुण्यात ६ सप्टेंबरलाही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.  पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.

Web Title: Rape of a six-year-old girl in Pune station area; Naradham rickshaw puller arrested within hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app