मंचरला वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक

By Admin | Updated: January 24, 2017 01:46 IST2017-01-24T01:46:49+5:302017-01-24T01:46:49+5:30

७७ वर्षांच्या वृद्धेवर २८ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव काशिंबेग फाटा येथे घडली. याप्रकरणी

Rape of old man; The youth is arrested | मंचरला वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक

मंचरला वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक

मंचर : ७७ वर्षांच्या वृद्धेवर २८ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव काशिंबेग फाटा येथे घडली. याप्रकरणी अमोल चिंतामण वाळुंज (वय २८, रा. वाळुजंवाडी) याच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वृद्ध महिला वडगाव फाटा येथील शेतातील घरात एकटीच राहते. आरोपी अमोल वाळुंज हा सायंकाळी वृद्धेच्या घरासमोर असलेल्या शाळूच्या पिकालगत झोपला होता, त्या वेळी वृद्धेच्या मुलाने त्याला हटकले असता पाणी प्यायला आल्याचे कारण त्याने सांगितले. त्या वेळी ‘पाणी पिऊन घरी जा,’ असे वृद्धेच्या मुलाने आरोपीला सुनावले होते. रविवारी रात्री ८ ते ९.३० च्या सुमारास घराच्या दरवाजाला धक्का मारून पत्र्यावर दगड टाकल्याचा आवाज झाला. त्या वेळी नातू आला असावा, असे समजून त्या वृद्धेने घराचे दार उघडले. वाळुंज घरात घुसला. वृद्धेशी झटापट करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला. रात्री वृद्धेचा नातू घरी आला. सकाळी या वृद्धेने तिच्या मुलाला झालेला प्रकार सांगितला. मुलाने पत्नीला घटना सांगून आरोपी अमोल वाळुंज याच्या घरी जाऊन जाब विचारला.
आरोपी अमोल वाळुंज याला झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारण्यात आला. त्याला वृद्धेच्या समोर आणले तेव्हा त्याने सर्व प्रकार कबूल केला. त्या वेळी त्याने ‘मी चुकलो, मला माफ करा,’ अशी गयावया केली.
संतप्त नागरिकांनी अमोल याला चोप दिला. वृद्धेच्या सुनेने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)

Web Title: Rape of old man; The youth is arrested