मदत करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; महावितरणमधील लिपिक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:29 IST2022-11-04T17:59:17+5:302022-11-04T18:29:53+5:30
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे...

मदत करण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; महावितरणमधील लिपिक अटकेत
पुणे : महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी महावितरणमधील लिपिकास अलंकार पोलिसांनी अटक केली. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सचिन रावसाहेब निकम (वय ५३, रा. पंचवटी, पाषाण रस्ता) याला अटक करण्यात आली आहे.
निकम आणि तक्रारदार महिलेची ओळख होती. महिलेला सदनिका घ्यायची होती. सदनिका खरेदी व्यवहारात मदत करण्याच्या बहाण्याने निकमने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला धमकावून त्याने बलात्कार केला. महिलेला मोबाइलवर अश्लील संदेश पाठविले. तिची बदनामी केली. महिलेने विचारणा केली तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेेने तक्रार दिल्यानंतर निकमला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सरला दसगुडे तपास करीत आहेत.