मतीमंद तरुणीवर बलात्कार; सहा महिन्यांनी प्रकार आला उघडकीस, नराधमाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:24 IST2022-06-21T17:24:43+5:302022-06-21T17:24:53+5:30
मतिमंद तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली

मतीमंद तरुणीवर बलात्कार; सहा महिन्यांनी प्रकार आला उघडकीस, नराधमाला अटक
पुणे : तरुणीच्या मतिमंदपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला मुंढवा पोलिसांनीअटक केली आहे. शंकर अंकुश ताकमोगे (वय ५८, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
याबाबत पीडीत तरुणीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी मतिमंद आहे. तिची आई घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत रखवालदार आहेत. सोसायटीने त्यांना राहण्यास जागा दिली आहे. आरोपी ताकमोगे याने मतिमंद तरुणीला घरात बोलावले. गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. आईवडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी दिली होती. डिसेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. त्यातून मतिमंद तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.