शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणा:या नराधमाला अटक

By admin | Updated: July 5, 2014 23:37 IST

खडकी-पिंपळगाव (ता़ आंबेगाव) येथील 11 वर्षाच्या शालेय मुलीवर बलात्कार करणा:या नराधमाला मंचर पोलिसांनी आज अटक केली.

मंचर : खडकी-पिंपळगाव (ता़ आंबेगाव) येथील 11 वर्षाच्या शालेय मुलीवर बलात्कार करणा:या नराधमाला मंचर पोलिसांनी आज अटक केली. सुनील बबन उधारे (वय 25, रा़ पारगाव तर्फे खेड) असे आरोपीचे नाव आहे. केवळ रेखाचित्रच्या आधारे पोलिसांनी त्याचा चित्तथरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले आह़े  
आरोपीने उसाच्या शेतात नेऊन या मुलीवर बलात्कार केला होता़  या घटनेची पोलिसांनी दखल घेऊन तपासाची सूत्रे हलविली़  3क् जूनला सदर व्यक्ती खडकी येथे आली होती व तिला अनेकांनी पाहिले होत़े  हा धागा पोलिसांनी पकडला़  पुणो येथून तज्ज्ञ आणून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले व त्याच्या आधारे तपास सुरू झाला़ 
खडकी गावातील विजय वाघमारे हे आजारी असताना त्यांचे सासरे रोकडे हे भेटण्यासाठी आले होत़े  त्यांच्यासमवेत या घटनेतील आरोपी आल्याचा माग पोलिसांना मिळाला़. त्या वेळी बलात्कार झालेली मुलगी व तिचा भाऊ गोठय़ात खेळत होत़े  आरोपी या मुलीसोबत बराच वेळ बोलत होता. त्याने तिचे नाव, गाव व इतर माहिती विचारून घेतल्याची माहिती पुढे आली़ खडकी येथे काम करणारा नास्तिक वाघमारे यानेही आरोपीला पाहिले होते; मात्र आरोपीबाबत ठोस माहीती मिळत नव्हती़  
पोलिसांनी नंतर रोकडे यांच्याकडे तपासासाठी मोर्चा वळविला. जऊळके  येथे जाऊन रोकडे यांच्याकडे तपास केला असता, खडकी येथे त्यांच्याबरोबर पारगावतर्फे खेड येथील सुनील बबन उधारे हा आला असल्याचे 
निष्पन्न झाले.
 पोलिसांनी मग उधारे याच्या घराकडे धाव घेतली, तेव्हा तो पत्नीसह मुंबईला गेल्याचे समजल़े आरोपी फरार होऊ नये, यासाठी पोलिसांनी राजगुरुनगर एसटी आगारात संपर्क साधून सकाळी मुंबईला गेलेल्या बसची माहिती घेतली़ या वेळी दुपारी 12 वाजता कुडे-बोरिवली ही बस मुंबईला गेल्याची माहिती देण्यात आली़ त्या वेळी गाडीचा वाहक विलास काळे याच्याशी संपर्क झाला़ एसटी लोणावळा येथे पोहोचणार होती. मंचर पोलिसांनी लोणावळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे, संजय सुपे, वीरसेन गायकवाड यांना आरेापीचे रेखाचित्र पाठवून घटनेची माहिती दिली़ एसटीमधील आरोपी सुनील उधारे त्याचा मोबाईल बंद करून पळण्याच्या तयारीत होता, त्या वेळी पोलिसांनी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ एसटी बस अडवून आरोपीला जेरबंद केल़े 
त्याने गुन्ह्याची कबुली दिली आह़े अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव बर्गे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव तसेच पोलीस आय़  ए. सय्यद, युवराज भोजणो, विकास जगदाळे, प्रशांत वाहील, दत्तात्रय टाकळकर, ए़  के. घोलप यांनी तपास केला़  पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत़ 
(वार्ताहर)
 
4बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील बबन उधारे याला काही तासांच्या आत जेरबंद करताना पोलिसांना ग्रामस्थ, तंटामुक्त समिती तसेच प्रसिद्घिमाध्यम यांची मोलाची मदत झाली़  आरोपी जेरबंद व्हावा, अशी लोकभावना होऊन जनतेने मदत केली़  आरोपी सुनील उधारे सराईत असून, तीन वर्षापूर्वी त्याने एक अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आह़े  तपासात उधारे यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आह़े