न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:28 PM2021-10-23T15:28:19+5:302021-10-23T15:33:40+5:30

प्रेमसंबंध निर्माण करुन इंस्ट्राग्रामवर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. परिणामाची कल्पना नसलेल्या आणि त्याच्या प्रेमात बुडलेल्या या अल्पवयीन मुलीने त्याला आपले न्यूड फोटो पाठविले...

rape of minor girl threatening nude photo viral pune crime news | न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पुण्यातील घटना

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पुण्यातील घटना

Next
ठळक मुद्देफोटो डिलिट करायचे असेल तर १ लाख ७० हजार रुपयांची मागणीही आरोपीने केलीपैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करुन तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली

पुणे : इंस्ट्राग्रामवर मैत्री करुन त्यातून प्रेमसंबंध स्थापित करुन एका अल्पवयीन मुलीला फसवून तिचे न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फोटो डिलिट करायचे असेल तर १ लाख ७० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी सुयश दत्तात्रय पानसरे (वय २१, रा. गंगाधाम सोसायटी, मार्केटयार्ड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असताना तिच्यासोबत २०१६ मध्ये मैत्री केली. नंतर प्रेमसंबंध निर्माण करुन इंस्ट्राग्रामवर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. परिणामाची कल्पना नसलेल्या आणि त्याच्या प्रेमात बुडलेल्या या अल्पवयीन मुलीने त्याला आपले न्यूड फोटो पाठविले.

त्यानंतर २०१९ मध्ये फिर्यादीचे आईवडील घरी नसताना सुयश घरी आला. त्याने हे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आता त्याने तुझे फोटो डिलिट करायचे असेल तर १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फोटो व्हायरल करुन तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे या तरुणीने घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक ढमढेरे तपास करीत आहेत.

Web Title: rape of minor girl threatening nude photo viral pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app